Home महाराष्ट्र ग्रामीण पोलीसांनी मशिदी वरील भोंग्यांचे डेसिबल मोजण्यास सुरुवात!

ग्रामीण पोलीसांनी मशिदी वरील भोंग्यांचे डेसिबल मोजण्यास सुरुवात!

231

🔸भोग्यांचा आवाज वाढल्यास कारवाई; मालेगाव, सय्यद पिंप्रीत तपासणी

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शाताराम दुनबळे)

नाशिक(दि.20एप्रिल):-महाराष्ट्र राज्यामध्ये भोग्॑यावर राजकारण पेटले असुन खबरदारी चा उपाय नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी मंगळवारी (दि. १९) सकाळी धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंग्यांचे डेसिबल मोजण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक ग्रामीणचे पोलीस पथकाने सय्यद पिंप्री गावातील मशिदींमध्ये नमाज पठण सुरू झाल्यानंतर तेथील भोंग्यांचे डेसिबल मोजले. मात्र, ते किती भरले, हे सांगण्यात आले नाही. भोंग्यांसाठी दिवसा ५५, तर रात्री ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. भोंग्यांसाठी परवानगी अनिवार्य करण्यात आली असून, डेसिबलच्या मर्यादेचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त टीम आवाज मोजण्याचे काम करीत आहे. त्यासाठी, त्यांना विशेष ट्रेनिंग देण्यात येत आहे.

असे आहेत पोलीस आयुक्तांचे आदेश

कोणत्याही धार्मिक स्थळावर आणि इतर ठिकाणी भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी ३ मेपर्यंत अर्ज करता येईल. मात्र, अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे काहीही म्हणायला परवानगी दिली जाणार नाही. मशिदीच्या १०० मीटरच्या आत प्रवेश दिला जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. ध्वनिप्रदूषण पातळीच्या नियमांचे पालन करावे: अन्यथा कायदा मोडणाऱ्यांना चार महिने ते एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. शिवाय दंड वेगळा असेल, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तडीपारी होऊ शकते, तसेच सहा महिन्यांसाठी अटक होऊ शकते, असे आदेशात नमूद करण्यात आले असून, आयुक्तांच्या या आदेशाची जोरदार चर्चा आहे. राज्य सरकारही हाच पॅटर्न राबविण्याचा विचार करीत असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here