Home पुणे महाराष्ट्र मध्ये RTE द्वारे सिनियर केजी ते बारावी पर्यंत होत असलेल्या लॉटरी...

महाराष्ट्र मध्ये RTE द्वारे सिनियर केजी ते बारावी पर्यंत होत असलेल्या लॉटरी पद्धतीने ऍडमिशन प्रक्रिया अजून सोपी करावी- अजित संचेती,महासचिव भारतीय राष्ट्रवादी पार्टी

269

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.19एप्रिल):-अर्थीक परस्थिती नाजूक असलेल्या विध्यार्थी यांच्या ऍडमिशन साठी आपल्या महाराष्ट्र मध्ये RTE अंतर्गत लॉटरी पद्धतीने काडून खाजगी शाळे मध्ये करून दिले जात याची आताची आपली प्रक्रिया ही पहिला फ्रॉम भरून दिला जातो,त्या मध्ये पहिला पत्ता त्यांनंतर एक 10 शाळा जमा करायचा व त्यानंतर तुम्ही लॉटरी पद्धतीने नंबर काढता त्यानंतर तुम्ही त्यांना 10 दिवसाची मुदत देतात व कागदपत्रे जमा करण्यास सांगता त्या मध्ये काही पालकांनाकडे कागदपत्र जमा करण्यास तयार नसतात व त्यामुळे पहिल्या यादी मध्ये आलेल्या मुलाचे अडमिशन वाया जात आहे. यासाठी आमची मागणी खलील प्रमाणे आहे.असे पत्रकात अजित संचेती म्हणाले आहेत…

1) RTE अडमिशन फ्रॉम भरून घेणे
2) त्यात पत्ता व शाळा निवडणे
3)कागदपत्रे मध्ये जन्म दाखल, पत्ता पुरावा,आधार कार्ड,उत्पनाचा दाखल,जातीचा दाखला असे ऑनलाईन फ्रॉम भरून करून घ्यावी व फ्रॉम प्रक्रिया पूर्ण करत असताना त्यात ज्याचे कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत व लॉटरी पद्धतीने ऍडमिशन करावे .या मध्ये पालकांचा मनस्ताप कमी होईल व आपल्या सरकारी कर्मचारी यांच्या वरील ताण कमी होईल याबाबत आपण लक्ष देऊन पुढच्या वर्षी पासून ही प्रक्रिया वरील दिलेल्या मागणी प्रमाणत करण्यात यावी अशी मागणी श्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, सौ वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री,श्री बच्चु कडू साहेब शिक्षण राज्यमंत्री, श्री विकास रस्तोगी शिक्षण प्रधान सचिव व शिक्षण आयुक्त श्री सुरज मांढरे यांना पत्राद्वारे भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महासचिव श्री अजित संचेती यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here