Home महाराष्ट्र उमरखेड येथे रोजा इफ्तार सर्व धर्मिय संमेलन

उमरखेड येथे रोजा इफ्तार सर्व धर्मिय संमेलन

280

🔹मा. डॉ. दिलीप पाटील भुजबळ (जिल्हा अधिक्षक यवतमाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.18एप्रिल):-उमरखेड पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी व मागील दिवसामध्ये साजरे करण्यात आलेले सण उसत्व तसेच येणारा पवित्र रमजान ईद चा सण हा अंदानात पार पडावा.अशी अपेक्षा मा. डॉ. दिलीप पाटील भुजबळ (जिल्हा अधिक्षक यवतमाळ) यांनी व्यक केली.

यावेळी सर्व समाजांचे नेतृत्व व मार्गदर्शन करणारे समाज बांधव मंचावर मा. डॉ. दिलीप पाटील भुजबळ (जिल्हा अधिक्षक यवतमाळ), मा.व्यंकट राठोड (उपविभागीय दंडाधिकारी, उमरखेड), मा. प्रदीप पाडवी (उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड), मा.प्राचार्य डॉ खेमधमो महाथेरो भन्ते (मुळावा), मा.साधू महाराज, मा.ऍड.संतोष जैन, मा.विजयराव खडसे (माजी आमदार उमरखेड), इमाम अहेमद, मा. अमोल माळवे (ठाणेदार उमरखेड) उपस्थित होते.समाजात एकता नांदावी, हम सब एक है, आपल्याला भारतीय होऊन जगायचे आहे.आम्ही पहिले ही भारतीय अहो आणि शेवटी ही भारतीयच अहो…! अशा भावना सर्वांनी च व्यक्त केल्यात.

तर उमरखेड पोलीस प्रशासनाच्या वतीने रोजा इफ्तार निमित्ताने उपस्थित सर्वांना फळ पार्टी येऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला.यावेळी शहरातील शाहरुख पठाण, सिध्दार्थ दिवेकर, प्रफुल दिवेकर, डी.के. दामोदर, शुद्धोधन दिवेकर, भीमराव सोनुले, डॉ सचिन मामीडवार, डॉ.अंबेजोगाईकर, विरेंद्र खंदारे, शैलेश ताजवे इत्यादी अनेक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here