Home महाराष्ट्र मराठी समाजशास्त्र परिषदेच्या 31 व्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रा.डॉ. स्निग्धा कांबळे यांचा सत्कार

मराठी समाजशास्त्र परिषदेच्या 31 व्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रा.डॉ. स्निग्धा कांबळे यांचा सत्कार

68

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.18एप्रिल):- कोकण विभागातील गोगटे ,जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी आणि मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी समाजशास्त्र परिषदेचे 31 वे राष्ट्रीय अधिवेशन “भारतीय समाज आणि विकास” या विषयाच्या अनुषंगाने 11व12 एप्रिल 2022 रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी या ठिकाणी पार पडले.

या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील अनेक नामवंत प्राध्यापक , शिक्षणप्रेमी व संशोधक विद्यार्थी यांनी या परिषदेत सहभाग नोंदवला.कोरोना काळातही मराठी समाजशास्त्र परिषदेने मोठ्या उत्साहाने ऑनलाइन पद्धतीने जवळपास वीस वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम संपन्न केले.या माध्यमातुन वेगवेगळ्या विषयांवर वैचारिक मंथन झाले . मराठी समाजशास्त्र परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे कार्यरत समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. स्निग्धा राजेश कांबळे यांनी मागील दोन वर्षांपासून मराठी समाजशास्त्र परिषदेच्या कार्यकारणी मध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या प्रतिनिधी म्हणून कार्य केले .

परिषदेद्वारा घेतलेल्या सर्व ऑनलाइन कार्यक्रमांचे उत्कृष्ट संचालन केल्याबद्दल तसेच त्यांनी मराठी समाजशास्त्र परिषदेद्वारा दिलेल्या विविध जबाबदाऱ्या अत्यंत समर्पक रीतीने पार पाडल्या त्याची जाणीव म्हणून प्रा. डॉ.स्निग्धा राजेश कांबळे यांना या 31 व्या राष्ट्रीय अधिवेशनात शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांचा गौरव करताना मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ.नारायण कांबळे यांनी त्यांच्या मराठी समाजशास्त्र परिषदेमधील योगदानावर प्रकाश टाकला व त्यांच्या कार्याचा गोडवा गायला. त्याचबरोबर ही मराठी समाजशास्त्र परिषद नेहमीच आपली ऋणी राहील असे प्रतिपादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here