Home महाराष्ट्र जिंतूर व परभणी शहरातून मुलीचे अपहरण झाल्याची प्रकरणात दोन गुन्हे दाखल

जिंतूर व परभणी शहरातून मुलीचे अपहरण झाल्याची प्रकरणात दोन गुन्हे दाखल

66

✒️आनंद टेकुळे(प्रतिनीधी परभणी)मो:-8830970125

परभणी(दि.18एप्रिल):-जिंतूर आणी परभणी शहरातून मुलीचे अपहरण झाल्याची प्रकरणात दोन गुन्हे दाखलं झाले आहेत.
जिंतूर शहरातील एका मुलीचे 13 एप्रिल रोजी अपहरण झाले आहे.मुलगी अकरावी वर्गात शिक्षण घेत होती 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता तिच्या वडिलांनी मुलीला परीक्षेसाठी कॅलेज मध्ये नेवून सोडले.परंतु परीक्षा देऊन ती घरी परत आली नाही.नातेवाईकांनी शोध घेतला.मात्र ती कुठेच आढळली नाही.

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून,एका आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखलं केला आहे.दुसरी घटना परभणी शहरात घडली. शहरात एका ऑटोरीक्षा चालकाच्या मुलीचे 13 एप्रिल रोजी अपराहणं झाल्याची घटना घडली आहे.वडिल कुंभारी येथे देव दर्शनासाठी गेले होते. तर मुलीची आई कामानिमित्त बाहेर गेली होती.सायंकाळी मुलीचे वडील घरी परत आले तेव्हा मुलगी घरी नसल्याचे समजून आले.परिसरात मुलीचा शोध घेतला.परंतु ती कुठेच मिळून आली नाही.या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आहे.कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुलीचे अपहरण केल्याचे तक्रारीत नमूद केले असून,त्यावरून अपहरणाचे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here