



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.18एप्रिल):-उन्हाळ्यात चंद्रपूरचं तापमान दिवसेंदिवस वाढत असून आग ओकु लागतं.शनिवारी चंद्रपूरचे कमाल तापमान ४४ सेल्सिअस होत.जागतिक स्तरावर चंद्रपूरचं तापमान नव्या स्थानी होते.आज रविवार पहाटेपासूनच उकडा जाणवू लागला असून अंगाची लाही,लाही होत असली सूर्यं तरी देवी महाकालीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा उत्साह मात्र कायम आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महाकाली देवी यात्रेची मुख्य पूजा पार पडली.
विदर्भ, मराठवाडा व इतर अनेक राज्यातील हजारो भाविकांनी येवुन चंद्रपूर महाकाली देवीचे दर्शन घेतले.महाकाली ही विदर्भातील अष्टशक्ती पिठांपैकी एक शक्तीपीठ आहे.चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या महाकाली देवी यात्रेला दरवर्षी चैत्र महिन्यात भरते. रामनवमी ते हनुमान जयंती काळात भाविकांनी मोठ्या संख्येने देवीचे दर्शन घेतले.एकूणच चंद्रपूर शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे





