Home बीड पत्रकार डाॅक्टर, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरील हल्लेखोरावर कठोर कारवाई करत शासकीय आधिका-यांकडुन ३५३...

पत्रकार डाॅक्टर, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरील हल्लेखोरावर कठोर कारवाई करत शासकीय आधिका-यांकडुन ३५३ कलमाचा दुरूपयोग तात्काळ थांबवावा,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

215

🔸गढी येथील डाॅ. पवार दांमपत्यावर हल्ला प्रकरणात कठोर कारवाई करा

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.18एप्रिल):- जिल्ह्य़ातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असुन पत्रकार, वैद्यकीय सुविधा देणारे डाॅक्टर तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले पाहता ही अत्यंत चिंताजनक बाब असून त्यातच दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे शासकीय आधिका-यांकडुन जिल्हाप्रशासनातील भ्रष्टाचार विषयी आवाज उठवताच अथवा प्रशासनाला जाब विचारताच कायद्याचि दुरूपयोग करत ३५३ कलम अथवा पोलीस प्रशासनातील आधिका-यांप्रती अप्रीती आदि कलमांतर्गत गुन्हे दाखल करून दडपशाहीसाठी कायद्याचा गैरवापर होताना दिसत असून यांच्या निषेधार्थ तसेच पत्रकार, डाॅक्टर, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरील हल्लेखोरावर संबधित पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत तसेच वैद्यकीय व्यवसायिकांवर हल्ला प्रकरणात संबधित कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी.

यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१८ एप्रिल सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शिरूर कासार अशोक कातखडे, डाॅ.संजय तांदळे, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन, आम आदमी जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे ,शहराध्यक्ष सय्यद सादेक ,हमीदखान पठाण,हिमा संघटना जिल्हाध्यक्ष डाॅ.लक्ष्मण जाधव ,उपाध्यक्ष डाॅ.अमरेंद्र विद्यागर, डाॅ.वासुदेव नेहरकर, डाॅ.अभय वनवे ,डाॅ.गिरीश किन्हीकर, डाॅ.सुबोध महाजन, डाॅ.धोंगडे सुरेश, डाॅ.होनराव उमेश, डाॅ.अजित जाधव,डाॅ.वाघमोडे, डाॅ.संभाजी पवार, डाॅ.सुनिता पवार, डाॅ.गुंजेकर, डाॅ.स्वामी, डाॅ.वाघ, डाॅ.नितिन सोनवणे,डाॅ.रोहीत झोडगे, डाॅ.सर्वोत्तम शिंदे, डाॅ.जितिन वंजारे,
…सहभागी आहेत.

सविस्तर माहीतीस्तव
__
बीड जिल्ह्य़ातील टीव्ही ९ चे जिल्हाप्रतिनिधी महेंद्रसिंह मुधोळकर यांनी कोरोनाकाळात सुरूवातीस स्थलांतरित होणा-या लोकांविषयी जिल्हाप्रशासनाच्या दुटप्पी भुमिकेवर बोट ठेवून प्रशासनाला जाब विचारला म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्याच्या हेतुने गुन्हा दाखल केला आहे तर पाटोदा येथिल सायं.दैनिक दिव्यवार्ताचे प्रतिनिधी शेख जावेद शेख रज्जाक यांच्यावर राज महंमद दर्गाह ईनाम जमिनीमध्ये अवैध बांधकामाची बातमी संदर्भात छायाचित्रे काढली म्हणून लोखंडी राॅडने डोक्यात जीवघेणा हल्ला झाला.संबधित प्रकरणात पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी,साप्ताहिक दिव्य आधार संपादक शेख रिजवान यांनी बीड जिल्ह्य़ातील विविध धार्मिक ईनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात पुराव्यासह दैनिकात बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर त्या बातम्यांच्या आधारे आम्ही तक्रारी केल्या आहेत त्याची दखल घेऊन त्यांना मंत्रालय व विधिमंडळ पत्रकार संघाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता त्यांच्या पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या जिवितास धोका असल्याची शंका उपस्थित करत त्यांच्या कुटुंबियांनी संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली असून त्याच्या समर्थनार्थ शासनाला आम्ही यापुर्वीच पत्रव्यवहार केला शस्त्र परवाना देण्यात यावा.तर दैनिक कार्यारंभ बीड दैनिकाचे मुगगाव येथील प्रतिनिधी पत्रकार अशोक भंवर यांनी ब्रम्हगाव-मुगगाव-सावरगाव घाट ऊर्फ भक्तिगड निकृष्ट रस्त्याप्रकरणात दैनिकात बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गढी येथील डाॅ. पवार दांमपत्यावर हल्ला प्रकरणात कठोर कारवाई करा
____
गेवराई तालुक्यातील गढी येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डाॅ.पवार दांमपत्यावर दवाखान्यात घुसुन क्षुल्लक कारणावरून हल्ला करणारांवर वैद्यकीय व्यवसायिकांवरील हल्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी.

पोलिस प्रशासनातील आधिका-यांकडुन पदाचा गैरवापर
___
बीड जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नोंदणी कार्यालयात दिवसा गोळीबार व सीसीटीव्हीची हार्डडिस्क गायब प्रकरणात सोशल मिडीयावर पोलीस अधिक्षक विरोधात टीपन्नी केल्यामुळे आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांच्यावर दाखल गुन्हा तसेच पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमी अभिमान खरसाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वृक्षतोडी संदर्भात विरोध केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शिरूर कासार अशोक कातखडे यांनी वाळुमाफियांविरोधात तक्रारी केल्यानंतर त्यांच्यावर वाळुमाफियांनी हल्ला प्रकरणात पोलिसांकडून वाळुमाफियांची पाठराखण करत कठोर कारवाई न करणे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी महावितरणच्या कर्मचा-यांनी तोडलेली वीज जोडणी केली म्हणून आणि शिव-शाहु उसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी पालीच्या धरणात जलसमाधी आंदोलन दरम्यान महावितरण आधिका-याकडुन दिलेला शब्द न पाळल्यामुळे जाब विचारल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे आदि.पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यनिष्ठतेबद्दल शंका उपस्थित करणा-या आहेत.

३५३ कलमाचा शासकीय आधिकारी-कर्मचा-याकडुन गैरवापर:
__
माहिती आधिकार कार्यकर्ते शार्दुल अॅड. देशपांडे यांनी मुख्य कार्यकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर विभागीय चौकशी लागणे यामुळेच शार्दुल देशपांडे यांच्याविरूद्ध ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर शेख बक्शु यांनी आरटीओ कार्यालयातील अनोगोंदी कारभार तसेच भ्रष्टाचार प्रकरणात तक्रार करून दोषींवर गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांच्यावर सुढबुद्धीने शासकीय कामकाजात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून आधिकारी कर्मचाऱ्यांकडुन सुडबुद्धीने या आधिकिराचा गैरवापर होत असून तो थांबायला हवा.

Previous articleसाकरे येथे गुरू – शिष्य जयंती निमित्त प्रबोधनपर व्याख्यान पुष्प संपन्न !
Next article138 वर्षांची नाट्य परंपरा असलेल्या चकलांब्यात गावकऱ्यांनी केला ‘चांदणे शिंपित जा’ नाटकाचा प्रयोग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here