Home महाराष्ट्र धुळगाव येथे आंबेडकर जयंती साजरी

धुळगाव येथे आंबेडकर जयंती साजरी

172

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दिनांक.14 एप्रिल ):-2022रोजी येवला तालुक्यातील धुळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली सुरुवातीस भीम व्याख्याते कुमार वैभव डी आहेर, काँग्रेसचे एकनाथ गायकवाड, वंचित चे शशिकांत जगताप, भीम आर्मीचे अमोल आहेर, सरपंच सौ दिपाली गायकवाड व आलेल्या मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून बुद्ध पूजा पाठ वंदना व भीम स्तुती घेण्यात आली यावेळी भीम व्याख्यान कार कुमार वैभव डी आहेर यांचा तसेच चेअरमन आप्पासाहेब गायकवाड, वाल्मीक गायकवाड, दत्तू गायकवाड, सरपंच दिपाली ताई गायकवाड यांचा आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला

यावेळी एकनाथ गायकवाड, पत्रकार पांडुरंग शेळके, सोमनाथ गायकवाड, वाल्मीक गायकवाड यांचीही भाषणे झाली.जगामध्ये गरीब जिथे आहे, तिथे शिक्षण कमी आहेत म्हणून आपल्या लेकरांना चांगले शिकवा असे विचार देणारे व वेळप्रसंगी उपाशी राहून ज्या समाजात हजार वर्षापूर्वी कुणी चौथी शिकल नाही त्यावेळेस त्या समाजात बाबासाहेब इंग्लंडहून बॅरिस्टर पदवी घेऊन आलेत हा भीम पराक्रम असून बाबासाहेबांनी आपल्या अभ्यासाचा व शिक्षणाचा उपयोग स्वतःसाठी न करता जनतेच्या उद्धारासाठी केला महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रह ,नाशिक येथील काळाराम मंदिराचा संघर्ष व जाती व्यवस्थित विरुद्ध पुकारलेला बंड यावर एक नजर टाकली तर बाबासाहेबांच्या आयुष्य किती अग्निकुंड होते असे वाटते, राजकारण समाजकारण यात वाहून घेणारा एक हाडामासाचा मनुष्य किती महान कार्य करू शकतो म्हणून आपण ही त्यांची जयंती साजरी करत असताना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन वाचत साजरी करताना माझ्यासारख्या भारतीय नागरिकाला आनंद होत असल्याचे उदगार यावेळी आपल्या व्याख्यान मालेत कुमार वैभव आहेर यांनी उद्गारले.

यावेळी पत्रकार पांडुरंग शेळके, वंचीतचे शशिकांत जगताप, पो. पा दिलीप गायकवाड, सरपंच सौ दिपाली ताई गायकवाड, एकनाथ गायकवाड, अप्पासाहेब गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साहेबराव गायकवाड, करण गायकवाड, करण जगताप, विशाल गायकवाड, संदिप गायकवाड, नितीन गायकवाड, कृष्णा गायकवाड, अमोल गायकवाड, अमोल सोनवणे, पप्पू गायकवाड, प्रवीण गायकवाड, सागर गायकवाड, समाधान गायकवाड, महेश वाघ, अमोल मांजरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड आदींनी परिश्रम घेतले धुळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here