



🔹मागील 7 वर्षांपासून केलेल्या लहानमोठ्या समाजपयोगी कार्याची घेतली संस्थेने विशेष दखल
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.17एप्रिल):-महाराष्ट्र राज्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली ठाणे जिल्ह्यातील यंगिस्थान फाऊंडेशन, उल्हासनगर ह्या संस्थेमार्फत मागील अनेक वर्षांपासून देशातील काही निवडक उत्कृष्ट व्यक्तींच्या कार्याची दखल घेत, त्यांचा राष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्यात येत असतो. ह्यावर्षी सुद्धा मागील काही दिवसांपूर्वी मुंबई येथील एक भव्य दिव्य पंचतारांकिक हॉटेलमध्ये संस्थेच्यावतीने राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये निरनिराळ्या राज्यातून देशातील फक्त पन्नास विशेष व्यक्तींच्या निःस्वार्थ कार्याची दखल घेत, त्यांना संस्थेमार्फत गौरविण्यात आले.
यामध्ये समाजकार्य क्षेत्रातून महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातून ब्रम्हपुरीचे युवा समाजसेवक श्री.उदयकुमार सुरेश पगाडे यांची निवड झाली, पण काही कारणास्तव त्याच वेळेला परीक्षा असल्यामुळे ह्या पुरस्कार सोहळ्याला, ते हजर राहू शकले नाही. म्हणून संस्थेने त्यांना पार्सल स्वरूपात सुंदरशी गोल्डन ट्रॉफी, सन्मानपत्र आणि मेडल भेट स्वरूपात पाठवुन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. अगदी महाविद्यालयीन वयापासूनच शिक्षण घेतांना, यांनी देशातील शंभर पेक्षा जास्त सामाजिक संघटनेशी जुडून लहान मोठे समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत, आणि त्यांच्या या कार्याची नोंद घेत, याआधीच जगातील मोठं मोठ्या संस्थांनी यांना विविध पुरस्कार देऊन गौरविले आहे, हेच विशेष आहे, असे यंगिस्थान फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.मिथिलेश झा साहेबांनी सांगितले. पुन्हा एकदा ब्रम्हपुरीचा नाव देश पातळीवर गाजविल्याबद्धल उदयकुमार यांचे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.


