Home बीड आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी आरोग्य शिबिराचे आयोजन

आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी आरोग्य शिबिराचे आयोजन

37

🔸रूग्णांनी लाभ घ्यावा डाॅ.राहूल टेकाडे यांचे आवाहन

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ. सरस्वती लाड)

आष्टी(दि.17एप्रिल):-येथील ग्रामीण रुग्णालयात आजादी अमृत महोत्सव अंतर्गत आरोग्य शिबिराचे मंगळवार दि. १९ रोजी आयोजन करण्यात आले आहे.या आरोग्य शिबिरात विविध आजारांची तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिराचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आष्टी ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे यांनी केले आहे.आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आजादीचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. १९ एप्रिल रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. सुरेश धस, मार्गदर्शक म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते तसेच प्रमुख उपस्थिती माजी आ. भीमराव धोंडे, माजी आ. साहेबराव दरेकर, तहसीलदार विनोद गुंडमवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या आरोग्य शिबिरात अंडवृद्धि, हर्निया, अपेंडिक्स, लहान मुलांमधील रंग टाय, जिभेवरील शस्त्रक्रिया, शरीरातील – सर्व प्रकारच्या गाठी शस्त्रक्रिया व दंत चिकित्सा आदी आजारावरील शस्त्र क्रिया व औषध उपचार मोफत करण्यात येणार आहेत.

तसेच गर्भाशय व स्तनाच्या गाठी, रक्तदाब, मधूमेह, असंसर्गिक आजार, ईसीजी, एक्स रे, सोनोग्राफी, रक्त व लघवी तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात स्त्रिरोग तज्ञ, शस्त्रक्रिया तज्ञ, दंतरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, आयुर्वेदिक तज्ञ, जनरल फिजिशियन या शिबिरात रुग्णांची मोफत तपसणी, शस्त्रक्रिया औषध उपचार करणार आहेत. या शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here