Home महाराष्ट्र चांदवड-खडक जांबला स्मशानभूमीच्या वादामुळे मृतदेह ग्रामपंचायत कार्यालय समोर जाळला

चांदवड-खडक जांबला स्मशानभूमीच्या वादामुळे मृतदेह ग्रामपंचायत कार्यालय समोर जाळला

58

✒️नाशिक विभागीय प्रतिनिधी(विजय केदारे)

चांदवड(दि.17एप्रिल):-तालुक्यातील खडक जांबला स्मशानभूमीच्या वादामुळे संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाळल्याची घटना घडली गेल्या आठ ते दहा महिन्यापासून सार्वजनिक समशान भूमी चा प्रश्न येथे चिघळला आहे याप्रश्नी न्यायालयात वाद सुरू असल्याने दोन स्मशान भूमी असून रस्ता नसल्याने हा वाद मिटत नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांनी संतप्त होत मृतदेह आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाळला.

शुक्रवारी खडकजाम येथील आदिवासी अरुण अमोल अशोक कोकाटे (२५) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्याचा मृतदेह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर जाळला या प्रश्नांवर अगोदर काही नागरिकांनी स्मशानभूमी रस्ता नसल्याने उपोषण केले तहसीलदार कार्यालय वरिष्ठांकडे दाद मागितली नंतर हा प्रश्न न्यायालयात गेला पण तो प्रश्न सुटत नसल्याने नागरिक संतप्त होऊन त्यानंतर आज सकाळी दहा साडेदहा वाजता मृतदेह जाळण्यात आला यावेळी सरपंच पुजा अहिरे उपसरपंच नाना गुंजाळ ग्रामसेवक अजय पुरकर व ग्राम पंचायत सदस्य यांनी मृतदेह ग्रामपंचायत समोर जाळू नये अशी विनंती केली मात्र संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह ग्रामपंचायतीसमोर जाळल्याने काही काळ वातावरण चांगलेच तापले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here