



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
नागभीड(दि.17एप्रिल):-ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी करण्यात येते.त्याच परंपरेला कायम ठेवत डॉ बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळच्या प्रहरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपसरपंच विजय पंढरीनाथ बोरकुटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सायंकाळी च्या प्रहरी बाबसाहेब समजलेल्या ,वाचलेल्या ओ.बि.सी. वर्गातील तरूण युवा मित्र परिवार चे सदस्य असलेल्या गावातील सिंहांच्या छाव्यांनी पुढाकार घेऊन भव्यदिव्य बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने नवेगाव पांडव येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढन्यात आली. या सर्व तरूण तडफदार पोरांना सरपंच अँड. शर्मिला रतनकुमार रामटेके नवेगाव पांडव यांनी विशेष सहकार्य केले.या शोभायात्रा चे उद्घाटक म्हणून मान.सचीन मोहन करूडकर यांच्या.शोबत मान.विवेक बाबुराव मेश्राम, कुणाल विठ्ठल बोरकुटे हे उपस्थित होते. मान सचिन मोहन करूडकर यांच्या हस्ते रिबिन कापून शोभायात्रा काढण्यात आली. डा. बाबा साहेब आंबेडकर यांच्या कट आउट ला.अँड शर्मिला रतनकुमार रामटेके, व संतोष रडके यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले.
दिप. प्रज्वलित सोसायटी सहकारी अध्यक्ष नवेगाव पांडव, मा .शशिकांत नारायण रहाटे मान.सदाशिव बोरकुटे उपाध्यक्ष सहकारी सोसायटी नवेगाव पांडव.श्रीमती शारदा ताई नवघडे, दर्शना गोकुळ देवगडे, मा् प्रदिप सदाशिव बोरकुटे, मा.नामदेवजी लटारे , यांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करण्यात आले.मा. बंशीधर चुर्ह साहेब,मा. दिवाकर नवगडे सर ,मान. रघुनाथ पानसे साहेब, कल्पना सुरेश नवघडे , मिराताई मानिकजी मशाखेत्री , निरंजना सोनटक्के , मा. पांडुरंग रामटेके,सन्माननीय सरपंच अँड शर्मिला रतनकुमार रामटेके मॅडम भिम जयंती निमित्त या सम्पूर्ण कार्यक्रमात सहभागी होते.
नवेगाव पांडव येथील समाजबांधव यांनी गावाचे कृतिशील नेतृत्व ॲड. शर्मीला रतन कुमार रामटेके यांना त्यांच्या कार्याबद्दल व त्यांच्या नेतृत्त्वात गावांचे नाव मोठे होत आहे. गावाला एक आगळीवेगळी ओळख प्राप्त झाली आहे.आपल्या कर्तृत्वाचा डंका जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वाजतो आहे. या सबबिचा आम्हा समाजबांधवांना अभिमान वाटतो. म्हणून हे सन्मान चिन्ह आज भिम जयंतीच्या निमित्ताने समाज बांधवांकडून आपणास प्रधान करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने उपस्थित ओ.बि.सी वर्ग आणि बौद्ध उपासक, उपसिका उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व युवा मित्रांनी अथक परिश्रम घेतले.विशेष परिश्रम अतुल दादाजी पांडव व सचिन सुभाष मशाखेत्री व इतर यांनी घेतले., जोपर्यंत SC ,ST, OBC चे तरूण एकत्र येऊन बसणार नाही तो पर्यंत विचारधारा एकमेकांना समजावल्याशिवाय पर्याय नाही.नवेगाव पांडव चे सिंहांचे छावे हे एकोपा निर्माण करण्यासाठी खुप प्रयत्न करित आहेत.हा संदेश नवेगाव पांडव तील तडफदार तरूण सर्व मित्र यांचे विचार दुसऱ्या गावातील तरुण पिढीला प्रेरणादायी व शिकण्या सारखं राहील.





