Home महाराष्ट्र शेअर मार्केटचा बुल आणि बिअर पोहोचला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत?

शेअर मार्केटचा बुल आणि बिअर पोहोचला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत?

175

✒️सातारा,खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

खटाव(दि.17एप्रिल):-माहिती आणि तंत्रज्ञान आणि अवघ्या जगाला आपल्या कवेत घेतले आहे. कोणतीही माहिती सेकंदात आपल्यासमोर उघडली जात आहे. जिथपर्यंत हवा जाऊ शकते तिथपर्यंत माहिती आणि तंत्रज्ञान आणि आपला कब्जा केलेला आहे. जगाच्या पाठीवर ज्या गोष्टी घडत आहेत त्या आता सहजरीत्या ग्रामीण भागातील जनतेपर्यंत मिळण्यास सुलभ झालेल्या असताना कोने एके काळी शेअर मार्केट म्हणजे काय? कसला बाजार असावा? याची माहिती दूरवाणी ,दूरचित्रवाणी, त्याच्यानंतर दैनिकात मार्फत लोकांपर्यंत पोचू लागली परंतु शेअर मार्केट म्हणजे काय हे कदाचित माहित आहे की नाही हा प्रश्न उभा असतानाच ग्रामीण भागातील युवा पिढी तरुण वर्ग एटीन प्लस ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे अशा जवळजवळ 50 टक्के च्या पुढे युवकांच्या मोबाईलवरील व्हाट्सअप, युट्युब ,ची जागा आता शेअर मार्केटच्या आलेखाने घेतल्याचे चित्र गावोगावी दिसत आहे.

गत दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जागतिक महामारी कोरोणा ने थैमान घातले होते. तरुण वर्ग नैराश्याच्या दिशेने वाटचाल करू करून लागला होता मिळेल ते काम हाताला करण्याची तयारी देखील होती याच कालावधीत नेमकी शेअर मार्केटच्या बुल आणि बियर डोके वर काढले आणि काहीशी चिंताग्रस्त परिस्थिती आज ग्रामीण भागात बघावयास मिळत आहे कारण शेअर मार्केट ही आजही जुगारच समजला जातो सेकंदात सर्व काही बुडाल्याची माहिती आज वर कानावर येणारी सत्य आहेच आणि यासाठी खबरदारी म्हणून पालकांनी शेअर मार्केट चांगले की वाईट यावर आता विचार करणे गरजेचे आहे.

एजंट आणि न्यूज चॅनेल यांची गर्दी वाढू लागली दोन ते तीन दिवसात किंवा एखाद्या महिन्यात हजार रुपयाची वीस हजार रुपये मिळत असतील तर गुंतवायला काय हरकत आहे तुझी सहज मानसिकता होणे क्रमप्राप्त आहे आहे. त्यामुळे तरुण पिढीच्या निराशेचा वाढते प्रमाण लक्षात घेता शेअर मार्केट साठी लागणारे डिमॅट अकाउंट आमच्या मार्फत मोफत काढा आम्ही तुम्हाला देईल त्या स्टॉकवर ट्रेड करा पैसे दुप्पट देण्याची खात्री आमची आणि खाली लहान अक्षरातली जाती शेअर मार्केट हे जोखीम भरलेले आहे त्यामुळे विचार करा आणि पैसे गुंतवा परंतु या छोट्या अक्षरातील मोठ्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही आहेत तो पैसा ग मूल्याची भीती आता व्यक्त होत असून तरुण पिढी दिवसाला पाचशे हजार मिळाले म्हणजे बास वरचा खर्च निघाला म्हणजे बस या भावनेपोटी काही पैसे गुंतवून आठ पंधरा दिवसात पुन्हा रिकामी होतात परंतु आपल्याला हक्काचे कष्टाचे काहीतरी करून खात्रीशीर व्यवसाय अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही यामुळे या तरुण पिढीला विसर पडत आहे .वेळीच पालकांनी हस्तक्षेप नाही केला तर शेअर मार्केटचा दुष्परिणाम हा ग्रामीण भागातील युवकांवर कसा झाला यावर लिहिण्या अगोदर आणि संशोधन करण्याबद्दल वेळीच सावध होणे गरजेचे आहे नाहीतर बुल आणि बिअर च्या भांडणात तरुण वर्गच मारला जाणार हे त्रिकालबाधित सत्य नाकारता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here