Home महाराष्ट्र आयुष्मान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र, यांच्या 4 थ्या वर्धापन दिनानिमित्त भव्य निःशुल्क...

आयुष्मान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र, यांच्या 4 थ्या वर्धापन दिनानिमित्त भव्य निःशुल्क आरोग्य मेळावा

241

🔸ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद

🔹आयुष्मान भारत व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत नावनोंदणी व कार्ड वितरण होणार

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.16एप्रिल):-ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयुष्मान भारत आरोग्य वर्धीनी केंद्र, यांचे 4 थ्या वर्धापन दिनानिमित्त आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्रशासन पुरस्कृत भव्य तालुका स्तरीय निशुल्क आरोग्य मेळावा ग्रामीण रुग्णालय नांदगांव खंडेश्वर येथे दिनांक 19 एप्रिल रोजी आयोजित करण्यात येत आहे.नांदगांव खंडेश्वर परिसरातील जनतेकरीता डॉ. राजकुमार चव्हाण, उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ, अकोला, डॉ. प्रमोद नरवने, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय अमरावती, व डॉ. दिलीप रनमाले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.

या शिबिरामध्ये ग्रामीण भागातील रुग्ण हे जिल्हा स्तरावर जाऊ शकत नाही त्यांच्या साठी ग्रामीण रुग्णालय नांदगांव खंडेश्वर येथे तालुका स्तरीय निशुल्क आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालय, नांदगांव खंडेश्वर, आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच या शिबिराला विशेषज्ञ डॉ. प्रविना देशमुख, स्त्री कर्करोग तज्ञ, डॉ. प्रविण धारगे बालरोग तज्ञ, डॉ. मोहम्मद कासीफ मो. हसनैन अस्थिरोग तज्ञ, डॉ. भारत शेटे जनरल सर्जन, डॉ. सतीश डहाके क्षयरोग व दमा रोग तज्ञ चेस्ट फिजिशियन, डॉ. रवि कुमार सरोदे मनोविकार तज्ञ, डॉ. अंकुश नवले अस्थिरोग तज्ञ, डॉ. पटेल नाक / कान / घसा तज्ञ, डॉ. अभिजित देशमुख मधुमेह / रक्तदाब तज्ञ, डॉ. स्वप्निल शिरभाते चेस्ट फिजीशियन, डॉ. दिनेश वाघाडे, डॉ. अरोरा कर्करोग तज्ञ यांच्या हस्ते रुग्णांची तपासणी होणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत डॉ प्रविना देशमुख, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय नांदगांव खंडेश्वर, कमल धुर्वे विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदगांव खंडेश्वर, जि. आर. पिसे. सहाय्यक अधीक्षक ग्रामीण रुग्णालय नांदगांव खंडेश्वर यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बंधू उपस्थित होते.

*शिबिराची वैशिष्ट्य*
(1) शिबिरामध्ये हायड्रोसील, हर्निया, अपेन्डीक्स व शरीरातील इतर गाठींचे निदान व उपचार करण्यात येईल.
(2) अस्थी रुग्णांची तपासणी करून निदान व उपचार करण्यात येईल.
(3) दंत विकार, मुख रोग, कर्करोग असणार्‍या रुग्णांची तपासणी.
(4) बाल रुग्ण, कुपोषित बालक,, मतिमंद बालक, शालेय आरोग्य तपासणी मधील बालक, बालकांचे जन्मतः सर्व आजारांवर तज्ञांकडून निदान व उपचार.
(5) स्त्री रुग्णांचे, गरोदर मातेची तपासणी, गर्भाशयाचे विकार, स्तनांच्या गाठी, पाळीचा त्रास, या सर्वांचे निदान व उपचार.
(6) मोतीबिंदू व डोळ्यांचे इतर आजारांचे निदान व उपचार.
(7) नाक, कान व घसा यांचे विविध आजारांचे निदान व उपचार.
(8) मधुमेह, रक्तदाब, हृदयविकाराचे रुग्ण व इतर आजारांचे निदान व उपचार.
(9) एक्सरे, ई. सी. जी., रक्ताच्या चाचण्या विविध चाचण्या व एच. आय. व्ही तपासणी.
(10) 30 वर्षावरील सर्व रुग्णांचे रक्तदाब व शुगर तपासणी.
(11) मानसिक आजारावर मार्गदर्शन व उपचार.
(12) या शिबिरामध्ये पात्र नागरिकांची महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांची नोंदणी करून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान भारत कार्ड वितरण करण्यात येईल.
(13) शिबिरामध्ये महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयातील विशेषज्ञ व जिल्ह्यातील, ग्रामीण रुग्णालयातील विशेषज्ञ सेवा देणार आहे.
(14) शिबिरात हिवताप रुग्ण, हत्ती रोग, अंड वृद्धि शस्त्रक्रिया साठी पात्र रुग्णांचे निदान व उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here