Home महाराष्ट्र बाळुमामाच्या पालखी च्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना सोई सुविधा पुरविण्याची केली मागणी

बाळुमामाच्या पालखी च्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना सोई सुविधा पुरविण्याची केली मागणी

330

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.16एप्रिल):-संत जनाबाई मंदिराच्या पाठीमागे बाळुमामाच्या पालखी च्या ठिकाणी दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना सोई सुविधा पुरविण्याची मागणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे सखाराम बोबडे पडेगावकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

गंगाखेड शहरात दोन दिवसापूर्वी बाळूमामाच्या मेंढ्या व पालखी आलेली आहे. संत जनाबाई मंदिराच्या पाठीमागे बाळुमामाची पालखी आहे. पालखीच्या दर्शनासाठी शहरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. मोठा मारुती मंदिर पासुन बाळूमामाच्या पालखी कडे जाणाऱ्या मार्गावर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे . पुलाच्या बांधकामाचे साहित्य रस्त्यावर पडल्याने रस्ता अरुंद झाला आहे.

तसेच नगरपालिकेने गावातील कचरा गोळा करून याच रस्त्यावर टाकलेला आहे . रस्त्यावर टाकलेला कचरा पेटवून देण्यात आल्यामुळे धूर पसरत आहे. रस्त्यांवर धूळ उडत आहे. त्यावर पाणी टाकणे गरजेचे आहे. उपस्थित महीला भक्तासाठी फिरते शौचालय व मुतारी उभारणे गरजेचे आहे.असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर, नारायण धनवटे, विक्रम बाबा इमडे,राहुल साबणे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here