



🔺गेवराई तालुक्यातील घटना
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.16एप्रिल):-दिवसाढवळ्या बीडच्या गढी येथील खासगी वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्टर पती-पत्नीला गावगुंडांनी क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केलीय. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
यात पतीला वाचवायला गेलेल्या महिला डॉक्टरला देखील मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून बीड जिल्ह्यात नेमक चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यात वाढते खून, दरोडा, मारामाऱ्या घटना वाढत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तर, आम्हाला न्याय द्या, अशी मागणी पिढीत डॉक्टर दांपत्याने केली आहे. या घटनेबद्दल सर्व डॉक्टर वर्गातून संताप व्यक्त केला जात असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत न्याय देण्याची मागणी केली आहे. गेवराई लगत असणाऱ्या गढी येथे दवाखान्याच्या दारात उभा केलेला रिक्षा बाजूला घ्यायला सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून, ओपीडीमध्ये येऊन डॉक्टर व डॉक्टरच्या पत्नीला मारहाण केली. तसेच यावेळी महिला डॉक्टरचा विनयभंग केला.
काहीच कारण नसताना आम्ही समजून सांगत असताना, अचानक येऊन त्यांनी मारहाण केली. माझ्या पत्नीला देखील त्यांनी मारहाण केली तसेच हाताने ओढणी ओढून विनयभंग केला. तसेच आता दवाखाना चालू देणार नाही अशी धमकीही देण्यात आल्याचे पीडित डॉ.संभाजी पवार यांनी सांगितले. या प्रकरणी महीला डॉक्टरच्या फिर्यादीवरून गोरख सूर्यवंशी, राहुल सूर्यवंशी व भाऊराव सूर्यवंशी या तिघांवर गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.


