Home महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आ. मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शीतपेयाचे वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आ. मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शीतपेयाचे वाटप

104

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.16एप्रिल):- येथील मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गुरवारी सायंकाळी शीतपेयाचे वाटप करण्यात आले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या रॅलीत सहभागी बौद्ध समाज बांधवांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते शीतपेयाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मोठया संख्येत बौद्ध समाज बांधवांनी शीतपेय वाटपाचा लाभ घेतला.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, लक्ष्मी नलभोगा, सुचिता लुटे, पूजा दुर्गम, प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, भाजपा
नेते शाम आगदारी, श्रीकांत सावे, निरंजन डंभारे, भारत साळवे, विक्की सारसर, विनोद जंजर्ला, मनमोहन महाकाली, हेमंत पाझारे, असगर खान, शंकर सिद्दम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here