Home महाराष्ट्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंती मोठ्या हार्ष उल्हाससात साजरी करण्यात...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंती मोठ्या हार्ष उल्हाससात साजरी करण्यात आली

208

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.16एप्रिल):-केज तालुक्यातील बनसारोळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या हर्षेउल्हासात साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जंयतीच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते संतोष जोगदंड यांनी केले .त्यानंतर बनसारोळा गावचे माजी सरपंच भागवत दादा गोरे व केज पचायंत समितीचे माजी सभापती युवराज दादा गोरे तसेच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दगडू रामभाऊ गोरे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार आर्पण करण्यात आले.तसेच फकिर दादा गायकवाड व बाबुलाल गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती बाबुराव बनसोडे सर होते.यावेळी ते बोलताना म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारत देशातील बहुजन समाजातील नागरिकांसाठी काम केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोर गरीब कष्टकरी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम केले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय समाजाला गुलामगिरीच्या बंदनातून मुक्त केले आहे. डॉ बाबासाहेब यांनी 1956 साली बौद्ध स्वीकारला होता.बाबासाहेब आंबेडकर यांनी माहात्मा ज्योतीबा फुले यांना आपले गुरू म्हणले होते.तसेच आमेरिकेतील कोलंबिया विध्यापिठात 200 वर्षेनंतर हुशार विध्यार्थीच्या यादीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नोंद करण्यात आली.

व सिम्बॉल ऑफद नॉलेज म्हणजे ज्ञानाच्या प्रतिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय.यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजपाल भैय्या काकडे नवनाथ काकडे बाळासाहेब जाधव बनसारोळा गावचे माजी सरपंच कुडंलिक नाना गायकवाड सुरेश गायकवाड सुनिल वाघमारे सौरभ गायकवाड आशोक साबळे अनंत धिवार रजनीकांत गायकवाड सुग्रीव जोगदंड राजकुमार गायकवाड सम्यक गायकवाड निर्भय गायकवाड महादेव गायकवाड व पुरोगामी पत्रकार संघाचे बीड जिल्हा सचिव धिवार राजकुमार पंचशील मित्र मंडळाचे कार्यकर्ते तसेच अन्य सामाज बाधंव उपस्थित होते.

Previous articleविनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे ‘तरंग २०२२ ‘ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
Next articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आ. मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शीतपेयाचे वाटप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here