Home अमरावती विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे ‘तरंग २०२२ ‘ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात...

विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे ‘तरंग २०२२ ‘ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

259

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:;9049587193

नांदगाव खंडेश्वर(दि.15एप्रिल):-येथील विनायक विज्ञान महाविद्यालय येथे विविध महाविद्यालयीन स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमासह ‘तरंग २०२२ ‘ वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न झाले. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अलका अनंत भिसे, उद्घाटक नांदगाव तहसीलचे तहसीलदार मा. श्री पुरुषोत्तम भुसारी आणि प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट अमरावतीचे श्रीमती सुषमाताई सोनटक्के (कोषाध्यक्ष), सौ माधुरीताई काळे, (सहसचिव) श्रीमती मीनाताई खोडके ( सदस्य), सौ सीमाताई खोडके( सदस्य) . डॉ. सुचिता खोडके (IQAC समन्वयक तथा उपाध्यक्ष) उपस्थित होते.

” महाविद्यालयातील अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातूनच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देऊन बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक,व सामाजिक दृष्ट्या परिपूर्ण करून उद्याचे सुजान नागरिक” घडविले जातात. असे मत आपल्या उदघाटन पर भाषनात तहसीलदार माननीय श्री पुरुषोत्तम भुसारी साहेब यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्रगतीचा गोषवारा डॉ. सुचिता खोडके यांनी आपल्या प्रास्तविक भाषानात मांडला. महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन डॉ. अनंत वडतकर यांनी केले.३१ मार्च व ०१एप्रिल अशा द्विदिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनात पहिल्या दिवशी मैदानी स्पर्धेचे आयोजन केले गेले. यामध्ये मुलांची कुस्ती स्पर्धा, मुला- मुलींची कबड्डी स्पर्धा, लांब उडी, उंच उडी, १००मी., ४०० मी. रनिंग इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्नेह संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी गीत गायन, एकल नृत्य, सामूहिक नृत्य, वेशभूषा स्पर्धा, पुष्प प्रदर्शनी, रांगोळी स्पर्धा इत्यादीं कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेवून उत्कृष्ट सादरीकरण केले.

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी अध्यापन कार्यासोबतच इतर क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल प्राध्यापकांचाही गुणगौरव करण्यात आला. यामध्ये डॉ. प्रशांत खरात, डॉ. प्रतिभा महल्ले, प्रा. सुबोध बनसोड यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश फुके यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गजेंद्रसिंग पचलोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आयोजन समितीचे डॉ. अनंत वडतकर,(समन्वयक) आणि सदस्य प्रा . अजय अंभोरे, डॉ. गजेंद्रसिंग पचलोरे, प्रा. राजीव तायडे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here