




🔹कांग्रेस मिडीया प्रमुख पप्पुभाई शेख यांची मागणी
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमुर(दि.16एप्रिल):-चिमुर नगर परिषदने लाखो रुपये खर्च करून कचरा गाड्या खरेदी केलेल्या गाड्या गेले कुठे नगर परिषदने घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी 17 ही प्रभाग करिता नवीन गाड्या खरेदी केले होते काही दिवस खुप चांगला कामे केले आणि काही अंदाजे 12 महिन्यांपासून कचरा गाड्या येणाच बंद झाले.आठवड्यातून फक्त 1 किंवा 2 दिवस येतो तेही मोजके प्रभागात बाकी दिवस दिसत नाही याचे कारण काय आहे. नाल्या पूर्णपणे भरून आहे. ते सुद्धा साफ होत नाही आहे.
आणि नगर परिषद जनतेकडून स्वच्छता कर पूर्ण घेतल्याशिवाय कोणतेही प्रमाण पत्र देत नाही तसेच खाली प्लाट किंवा मकाणकर काही कारणास्त वेडेवर कर भरले नाहीतर त्यावर शास्तीकर घेतात, नळाला पिण्याचे पाणी पुरवठा बरोबर होत नाही . जवळपास 15 ते 20 दिवस होत आहे प्रभाग क्र.12 बुद्धीविहाराकडील भागात पाणी येत नाही आहे काही भागात येतो तोही सुरुवातीला खराब पाणी येतो नंतर 1गुंड चांगला आणि नळ जातो असे प्रत्येक प्रभागात हीच परिस्थिती आहे. असास चालत राहील आणि जनता कर भरत राहील का असे अनेक प्रश्न आहे. याकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा पूर्णपणे कर माफ करण्यात यावे असी मागणी कांग्रेसचे मिडीया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केली आहे.




