Home महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

173

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.16 एप्रिल):-स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रहापुरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील आंबेडकर विचारधारा विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वेबिनारचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचे अमेरिकेतील ख्यातनाम अभ्यासक आणि प्रचारक लामा रंगद्रोल वेबीनारचे बीजभाषक म्हणून उपस्थित होते.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सदस्य, दिपांकर कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांचे विचार अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आजही प्रासंगिक आहेत असे भाष्य केले.

या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटन करतांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी एका चांगल्या विषयावर वेबिनार आयोजनाबाबत महाविद्यालयाचे कौतुक केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आणि विचारावर प्रकाश टाकून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेचे सर्वांनी वाचन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे बिजभाषक लामा रंगद्रोल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुध्द यांचे विचार आपल्या वर्तनात जोपर्यंत प्रतीत होणार नाही तोपर्यंत त्या विचारांचे माहात्म्य सिद्ध होणार नाही. विश्व कल्याणासाठी बुद्धांच्या समग्र विचारांचे आकलन होने गरजेचे आहे तसेच जगाच्या आणि मनाच्या शांतीसाठी मानवी हृदयात करुणा आणि सहानुभूतीची भावना संप्रेरीत झाली पाहिजे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.देवेश कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संपूर्ण जग बुध्द, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या दिशेने अग्रेसित होत आहे असे भाष्य केले.

वेबिनारच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा डॉ.आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. देवेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाचे प्रा.तुफान अवताडे तथा महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद यांनी सहकार्य केले.

वेबीनारचे संचालन प्रा.तुफान अवताडे, पाहुण्यांचा परिचय प्रा. राजेश कोसे आणि प्रा. डॉ. धर्मपाल फुलझेले यांनी तर आभार प्रा. डॉ लोकेशकुमार नंदेश्वर यांनी मानले.या वेबिनारला देश विदेशातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here