Home बीड ज्योतिबाच्या यात्रेत अभिषेकासाठी गोदावरी पात्रातून पाणी आणण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

ज्योतिबाच्या यात्रेत अभिषेकासाठी गोदावरी पात्रातून पाणी आणण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

115

🔺गेवराई तालुक्यातील दुदैवी घटना

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.16एप्रिल):-ज्योतिबाच्या यात्रेत अभिषेकासाठी पाणी आणण्यास गेलेल्या दोन युवकांचा राजापूर येथील गोदावरील पात्रात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री दोन्ही युवक नदीत बुडाले होते, तब्बल १२ तासांच्या शोध मोहिमेनंतर दोघांचेही मृतदेह आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान सापडले. मोहन नाना आतकरे व शिवाजी ज्ञानदेव इंगोले अशी मृतांची नावे आहेत.

निपाणी जवळका येथे जोतिबा यात्रा सुरु आहे. यानिमित्त काही युवक अभिषेकासाठी पाणी आणण्यासाठी शुक्रवारी रात्री राजापूर येथील गोदावरी पात्रात गेले होते. मात्र, पाणी घेऊन परत येताना मोहन आतकरे आणि ज्ञानदेव इंगोले सोबत नसल्याचे इतर युवकांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती लागलीच ग्रामस्थांना दिली.

यानंतर युवकांनी ग्रामस्थांच्या मदतीने मोहन आणि ज्ञानदेवची शोध मोहीम सुरु केली. रात्री अंधारामुळे त्यांचा शोध लागला नाही. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली असता मोहन आणि ज्ञानदेव यांचे मृतदेह पात्रात आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here