Home महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

608

🔸विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे केले वाटप

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.15एप्रिल):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली.भारतरत्न तसेच द सिम्बॉल ऑफ नॉलेज समजले जाणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीच्या अनुषंगाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तसेच नवीन येणाऱ्या पिढीला शिक्षणाचे महत्व समजवुन त्यांना शिक्षणास प्राधान्य देण्याच्या उद्देशाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड महीला शहराध्यक्षा तसेच आभा न्यूज (आवाज भारताचा) च्या संपादिका सौ मंदा बनसोडे यांच्या हस्ते मुलांना वह्या व पेन यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पदाधिकारी तसेच के एस न्यूजच्या संपादिका सौ उषा लोखंडे तसेच निर्मला टाइम्सच्या संपादिका तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पदाधिकारी निर्मला जोगदंड आदी पदाधिकारी उपस्थित होते.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूर व श्री रवींद्रनाथ टागोर प्रा विद्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूर व श्री रवींद्रनाथ टागोर प्रा. विद्यालयाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम गंजगोलाई ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क पर्यंत ढोल ताशाच्या गजरात रॅली काढण्यात आली. त्यानंतर १०१ किलोचा पुष्पहार जेसीबीच्या सहाय्याने अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी राज्य महिला अध्यक्षा डॉ सुधाताई कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली पाटील, जिल्हा संघटक संजय राजुळे, प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, नितिन हांडे, श्रीकांत चालवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, भंडारा जिल्हा शाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

लोहा येथील शासकीय विश्रामगृहात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शाखा लोहाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोहा कंधारचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करून १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार साहेबराव सोनकांबळे, लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, तालुका उपाध्यक्ष संजय कहाळेकर, सरचिटणीस प्रदिप कुमार कांबळे, सचिव मारोती चव्हाण, सहसचिव तुकाराम दाढेल, कोषाध्यक्ष रमेश पाटील पवार, प्रसिद्धी प्रमुख शिवराज दाढेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here