



✒️चोपडा(पुरोगामी न्युज नेटवर्क)
चोपडा(दि.15एप्रिल):-जिल्हा परिषद मुलींची शाळा लासुर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा जळगाव च्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्षा संगीता भादले हे होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन, जिल्हाध्यक्ष महेंद्र माळी जिल्हा परिषद मुलांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदलाल माळी, जिल्हा परिषद मुलींची शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संजय विसावे, मुख्याध्यापक सुनंदा पाटील मॅडम हे होते.कार्यक्रमाच्या सुरवातीस विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
जितेंद्र महाजन यांनी डॉ बाबासाहेब लासुर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न यांच्या सामाजिक,शैक्षणिक आणि राजकीय कार्य याबाबत माहिती दिली तसेच सदर स्पर्धा ही विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, दिलेले योगदानाबद्दल माहिती मिळावी हे उद्देश समोर ठेऊन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असे मत मांडले.
स्पर्धेत शाळेतील इयत्ता ३ व ४ च्या २१ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असून प्रथम कु.नेहा गजानन पाटील,द्वितीय कु. निशा भास्कर मगरे, तृतीय कु.समृद्धी विनोद माळी या विद्यार्थीनी आले असून त्यांना बक्षीस शालेय उपयोगी साहित्य व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले सर्व विद्यार्थीनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या केलेले सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, बहुजन समाजाप्रती केलेले कार्य आपल्या वक्तृत्वातून मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक जिजाबाई बाविस्कर,राजेंद्र शिरसाठ,विकास शिंदे, श्रीराम कोळी,सूर्यप्रकाश बाविस्कर,रविकांत मगरे,कल्पनाबाई पवार यांनी सहकार्य केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सूर्यप्रकाश बाविस्कर व आभार उपशिक्षक राजेंद्र शिरसाठ यांनी मानले.





