



✒️सिध्दार्थ दिवेकर(प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.15 एप्रिल):-शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुख्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधून भव्यदिव्य अशी विश्वरत्न, महामानव क्रांतीसुर्य, परमपूज्य, बोधिसत्व, आधुनिक भारताचे पाहिले कायदेमंत्री, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती ची भव्य दिव्य मिरवणूक रॅली काढण्यात आली होती.मागील दोन वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारचा सण-उत्सव कोरानो च्या महामारी ने साजरा झाला नव्हता.पण यावर्षी सरकाने भीम जयंती ला कोणताही निर्बंध लावले नव्हते.
मागील अनेक वर्षापासून शहरातील मुख्य डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधून रॅली निघत असते या रॅलीमध्ये शहरातील व तालुक्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुयायी रेकॉर्ड तोड गर्दी करून डीजेच्या तालावर “जय भीम चं नाव जगी गाजत”…! “भीमाचं गाणं डीजेला वाजत”…! अशा गीतांवर ठेका धरला होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शांततेच्या मार्गाने या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.सदर रॅली डॉ. आंबेडकर वार्ड, नाग चौक, बस स्थानक, माहेश्वरी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा येथे सामूहिक त्रिशरण पंचशील गाथा भन्ते कीर्ती बोधी यांनी गायली.शेवटी डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे विसर्जित झाली.
कार्यक्रमाचे आयोजक प्रफुल दिवेकर (अध्यक्ष जयंती उत्सव समिती, उमरखेड) आणि शुद्धोधन दिवेकर (सहआयोजक) यांनी केले होते.या रॅलीला उमरखेड पोलिस प्रशासनाने अतिउत्तम प्रकारे रॅली सांभाळून कडक बंदोबस्त केल्यामुळे रॅली शांततेच्या मार्गाने संपन्न झाली.या बद्दल पोलिस प्रशासनाचे व ठाणेदार मा. माळवे साहेब व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सिध्दार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना) यांनी केले.यावेळी कुमार केंद्रेकर, श्याम धुळे, नितिन आठवले, कैलास कदम, माही धुळेकर, संतोष इंगोले, तुषार पाईकराव व सर्व महिला मंडळी,तरुण मंडळी बालक बालिका हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.


