Home महाराष्ट्र नांदगाव येथे आनंदराज आंबेडकर व सचिन साठे यांच्या उपस्थितीत अॅड. राहुलजी विष्णू...

नांदगाव येथे आनंदराज आंबेडकर व सचिन साठे यांच्या उपस्थितीत अॅड. राहुलजी विष्णू तुपलोंढे (B.C.S.,LL.B.) यांचा भव्य नागरी सत्कार उत्साहात संपन्न

197

✒️जिल्हा प्रतिनिधी नाशिक(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि 15एप्रिल):- नाशिक-नांदगाव येथील सर्व पक्षीय संघटनांचे वतीने आज रोजी संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी नांदगांवचे भूमीपुत्र असलेले, ज्यांचे हायस्कूलचे शिक्षण नांदगावमध्ये होऊन नंतर नासिकला स्थायिक झालेले अॅड. राहूलजी विष्णू तुपलोंढे यांनी कायद्याची पदवी व सनद घेतल्याने यांचा भव्य नागरी सत्कार रिपब्लीकन सेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब (संस्थापक रिपब्लिकन सेना) भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांचे हस्ते संविधान प्रस्तावना ऊद्देशिकेची प्रतिकृती देऊन सन्मानित करण्यात आले.

आपल्याच बालभूमीत आपल्याच माणसांकडून व विशेष म्हणजे बाबासाहेबांचे वंशज (नातू) ज्यांनी विदेशात ऊच्चत्तम शिक्षण घेतलेले आहे त्या श्रध्देय व्यक्तीमत्वाच्या हातून होणारा हृद्य सत्कार हा जगातला सर्वोच्च बहूमान असल्याची भावना अॅड. राहूलजी तुपलोंढे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.

याप्रसंगी मानवहित लोकशाही पक्ष संस्थापक अध्यक्ष सचिनजी साठे साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांचे नातू, मा. सचिनजी बोरसे मा. ना. बच्चूभाऊ कडू, शालेय शिक्षण राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक, मुंबई, मा. अॅड. अनिलदादा आहेर मा.आमदार नांदगाव तालुका) , शिवाजी गायकवाड, राहुलभाई जाधव बेरोजगार युवक आंदोलन, नासिक गोपीभाई गरूड रिपब्लिकन सेना मनमाड शहर आदिंसह अनेक मान्यवर ऊपस्थित होते. सदरचे कार्यक्रमाचे आयोजन श्री मनोजभाई चोपडे युवानेते, शहराध्यक्ष काॅग्रेसपक्ष, नांदगाव शहर यांनी यशस्वीरित्या केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here