



✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी
चिमुर(दि.15एप्रिल):-तालुका कांग्रेस कमेटी, व शहर कांग्रेस कमेटी, चिमुर यांचे वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित प्रतिमेला हारार्पण व दीप पर्जवल करुन जयंती साजरी करण्यात आली आहे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक येथे जाऊन माल्लार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष संजय घुटके, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, तालुका पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रदीप तळवेकर, कांग्रेसचे जेष्ट धनराज मालके, मिडीया प्रमुख पप्पुभाई शेख, तालुका उपाध्यक्ष विनोद ढाकुणकर, राजू चौधरी, जिल्हा महासचिव युवक काँग्रेसचे गौतम पाटील, विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे,तालुका अल्पसंख्याक सेलचे महिला अध्यक्षा नाजेमा पठाण ,उपाध्यक्षा शहेनाज आंसारी , माजी नगरसेविक कल्पनाताई इंदुरकर, माजी तालुका अध्यक्ष अनुसूचीत जातीचे विनोद राऊत , शहर चे महासचिव दीपक कुंभारे ,विधानसभा युवक काँग्रेसचे माजी महासचिव प्रवीण जिवतोडे , तालुका युवक काँग्रेसचे माजी महासचिव अमित मेश्राम , व कार्यकर्ते राजु पाटील , जयदरथ खोब्रागडे, इत्यादी उपस्थित होते





