Home महाराष्ट्र जि.प.शाळा साताळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जि.प.शाळा साताळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

203

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.15एप्रिल):- जि.प. शाळा साताळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

भाषण स्पर्धेत सिद्धीका संदीप सोनवणे (प्रथम क्रमांक) , प्रज्ञेश सोनवणे ( द्वितीय क्रमांक) श्रध्दा अभिमान गुंजाळ ( तृतीय क्रमांक) मिळविला. विजेत्या विदयार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापिका श्रीम. वंदना नागपुरे मॅडम यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. वंदना नागपुरे मॅडम , श्री. जगन्नाथ आहेर सर , श्री. सचिन लांडगे सर, श्री.ऋषिकेश वाडेकर सर, श्रीम. वृषाली पगार मॅडम, श्रीम. अश्विनी पारखे मॅडम आणि शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्त उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here