



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.15 एप्रिल):भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगान आबादी येथे श्री. विजयभाऊ भागडकर, युवा उद्द्योजक मुंबई यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पूर्णाकृती भव्यदिव्य पुतळ्याचे अनावरण दि. 14 एप्रिल रात्री थाटात पार पडले. यावेळी जयभीमच्या जयघोषाने वातावरण दणाणून गेला होता. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खेमराजजी तिडके अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी उपस्थित होते.
तर सहउद्घाटक म्हणून उमेशजी धोटे सरपंच ग्रा. पं. चौगान, दिवाकरजी मातेरे अध्यक्ष से. स. संस्था चौगान, राजेशजी धोंगडे सर, केवलरामजी लिंगायत उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अंकुशजी मातेरे उपसरपंच ग्रा. पं. चौगान, पंकज भाऊ तिडके सदस्य ग्रा. पं. चौगान, अविनाशजी सहारे सदस्य से. स. संस्था चौगान, श्रीहरी देवगडे, धनराज तुंबडें, सुरेश गुणशेटवार, मधुकरजी राऊत अध्यक्ष तं. मु. स. चौगान, वर्षाताई गुणशेटवार सदस्या ग्रा. पं. चौगान, सरिताताई बुराडे सदस्या ग्रा. पं. चौगान, जयश्री बुराडे सदस्या ग्रा. पं. चौगान, सुधाताई मैंद सदस्या ग्रा. पं. चौगान, ज्योतीताई चहांदे सदस्या ग्रा. पं. चौगान, प्रियांकाताई कामडी सदस्या ग्रा. पं. चौगान, सुचित्रा बुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विजयभाऊ भागडकर यांच्या विशेष प्रयत्नातून या पुतळ्याची निर्मिती झाली आहे.
या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना विजयभाऊ भागडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्मारक हे त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेउन त्यानुसार मार्गक्रमण करण्याची शिकवण देतात. आपण त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन येणारी उज्वल पिढी निर्माण करायची आहे. व्यसनाधीनते पासून तरुणांना दूर सारायचे आहे. चौगानचे सरपंच उमेश धोटे म्हणाले की, बाबासाहेब यांचे विचार आणि कार्य जगाला तारणारे आहे. त्यांच्या या स्मारक पासून चौगानवासी नक्की प्रेरणा घेतील. या स्मारकाच्या सौंदरीकरण ग्रामपंचायत च्या माध्यमातून आम्ही करू, असे त्यांनी या ठिकाणी आश्वसन दिले. प्रा. अंकुश मातेरे यांनी मार्गदर्शन करतांना स्त्रियांच्या प्रगतीत बाबासाहेब आंबेडकर यांचे असलेले योगदान विषद केले. दिवाकर मातेरे यांनी बाबासाहेब हे आपल्या सर्वांचे आहेत. ते कोण्या एका समाजाचे नाहीत, कोण्या एका जातीचे नाहीतर तर सर्व मानव जातीचे आहेत. कारण माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा माणूस कोण्या एकाच समाजाचा राहू शकत नाही. असं मत त्यांनी व्यक्त केलं. तर अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना खेमराज तिडके म्हणाले कि, बाबासाहेब आंबेडकर हे समस्त भारतीयांचे आदर्श आहेत. आज त्यांनी देशाला बहाल केलेल्या संविधानानुसार देश मार्गक्रमण करीत आहेत.
संविधानाने महिला, पुरुष सर्वांनाच संधीच्या समान संधी दिल्या. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य हे सदैव प्रेरणादायी आहेत.
अनावरण सोहळ्या प्रसंगी विजय भागडकर व पंकज तिडके यांच्या कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच चौगान आबादी येथे होऊ घातलेल्या महर्षी वाल्मिकी यांच्या स्मारकाचं भूमिपूजन खेमराज तिडके अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी, विजय भागडकर, उमेश धोटे सरपंच चौगान, प्रा. अंकुश मातेरे उपसरपंच चौगान, पंकज तिडके सदस्य ग्रामपंचायत चौगान, अविनाश सहारे सदस्य से. स. संस्था व गावकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलं.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश धोंगडे यांनी केले. संचालन सागर लिंगायत तर आभार केतन लिंगायत यांनी मानले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी फुलेशाहू आंबेडकर विचारमंच/बौद्ध समाज, रमाई महिला बचत गट, शिवजन्मोत्सव समिती, महात्मा फुले स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, नायक क्रीडा समिती आणि समस्त चौगानवासी प्रचंड मेहनत घेतली.


