Home महाराष्ट्र शेणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित

शेणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित

292

🔸शेणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित

🔹शेतकरी संघटनेने दिला होता आंदोलनाचा इशारा

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.-14एप्रिल):-सध्याच्याघडीला जिवती तालुका समस्याचे माहेरघर बनले आहे जिवती तालुक्यातील शेणगाव ग्रामपंचायत लोकसंख्येने मोठी आहे. इथे आठवडी बाजार पण मोठा भरतो आजूबाजूच्या गावखेड्यातील जनतेला शेणगाव हे सोईस्कर ठरते, सध्या उन्हाळा सुरु असुन तालुक्यात उन्हाच्या उष्णते मुळे परिसरितील जनता बिमार होत आहे, त्यांना उपचार घेण्यासाठी गडचांदूर किंवा चंद्रपूरला जावे लागत असल्यामुळे रुग्णाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शेणगाव येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम संपुर्ण झाले असुन कोणतेही काम शिल्लक राहिलेले नाही, संपूर्ण पदांची भरती प्रकिया पूर्ण झालेली आहे, आरोग्य केंद्रात लागणारी संपूर्ण यंत्र सामुग्री व फर्निचर व साहित्याची खरेदी करून पुरवठा सुद्धा करण्यात आलेला आहे. व सदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पनासाठी शासनाकडे तसा प्रस्ताव सुद्धा पाठवला असताना सुस्त प्रशासन या आरोग्य केंद्राचे उद्घाटन करून नागरिकांच्या सेवेत अर्पण का करत नाही म्हणून जिवती तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता, व ही भली मोठी इमारत येत्या काळात शोभेची वास्तू बनुन राहू नये म्हणून तात्काळ या इमारतीचे सुस्त शासन व प्रशासना कडून उद्घाटन करुन परिसरातील जनतेच्या आरोग्या सेवा त्वरीत उपलब्ध करून दयावी अश्या मागणीचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांना सय्यद शब्बीर जागीरदार तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना, व उध्दव गोतावळे तालुकाध्यक्ष दलित आघाडी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते निवेदनात आठ दिवसात इमारतीचे उद्घाटन करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.

परंतु संबंधित प्रशासनाने निवेदनाची दखल घेतली नसल्याने निवेदन कर्त्यांनी आंदोलन करण्यात साठी दिनांक १२ एप्रिल रोजी परवानगी अर्ज माननीय तहसीलदार साहेब जिवती तसेच पोलिस निरीक्षक जिवती व माहिती साठी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांना दिले या परवानगी अर्जा मध्ये २२ एप्रिल २०२२ ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता,याचाच धसका घेऊन जिल्हा आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेतली असून लवकरच या आरोग्य केंद्राचे रितसर उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती दिली आहे व शेतकरी संघटने कडून २२ एप्रिल २०२२ ला होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करावे अशी माहितीचा पत्र जिल्हा आरोग्य विभाग चंद्रपूर यांच्याकडून देण्यात आला आहे, येत्या काही दिवसात या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रितसर उद्घाटन झाले नाही तर शेतकरी संघटने कडून पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर अनोख्या पध्दतीने तीव्र आंदोलन छेढण्यात येईल असा ईशारा या वेळी सुद्धा सय्यद शब्बीर जागीरदार तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना, उध्दव गोतावळे दलित आघाडी तालुकाध्यक्ष यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here