



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.14एप्रिल):-जिल्हा कॉंग्रेस कमिटी आणि अनुसूचित विभाग काँग्रेस च्या वतीने अंधारात खितपत पडलेल्या आणि जाती, जाती मध्ये विखुरलेल्या बहुजन समाजाला प्रकाशित करून अनंत काळापासून गुलामगिरी च्या खोल विहीरिमध्ये डूबलेल्या बहुजन समाजाला वर काढून दुनियेचे दर्शन घडवणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन माजी खास.मारोतरावजी कोवासे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे, महराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव तथा माजी आम. डॉ.नामदेव उसेंडी, प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, शहराध्यक्ष सतीश विधाते, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हसनअली गिलानी, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा महासचिव समशेरखान पठाण जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, माजी नगरसेवक रमेश चौधरी, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, विश्वजीत कोवासे, दिपकभाऊ मडके, काँग्रेस नेते दामोदर मंडलवार, नंदु कायरकर, समय्या पशुला, हरबाजी मोरे, संजय चन्ने, सदाशिव कोडापे, पंडित पुडके, बाबुराव गडसुलवार, आय. बी. शेख, अरुण पुण्याप्रेद्दिवार, अरुण भादेकर, अतुल तुमपल्लीवार, अब्दुलभाई पंजवानी, महादेव भोयर, संजय नेरकर, अनिल कोठारे, रेहान शेख, दिलीप घोडाम, अपर्णा खेवले, आशा मेश्राम सह अनेक मान्यवर आरोग्य विभागाच्या वतीने डॉ.ऋषिकेश देशमुख,राहुल वाळके, विजया मंडाले, योगीता कातंगे, अतुल बांबोळे, प्रफुल राउत, भाग्यश्री मेश्राम, पंकज निखाडे उप्स्थीठ होते.
तर रविंद्र सहारे,संजय चन्ने, संजय शिंपी, राजसिधार्थ पशुला, राकेश गडपायले, योगेश्वर देवलवार, अजय नरोटे, विशाल बनसोड, योगेश गोवर्धन, देवराव भुरसे, भूषण कुनघाडकर, प्रफुल बारसागडे, संतोष बारसिंगे इत्यादी रक्तदात्यांनी रक्त देऊन बाबासाहेबांना आदरांजली दिली.


