



✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.14एप्रिल):-शहरातील नामांकित असलेले श्री सरस्वती विद्यालय या ठिकाणी दिनांक 14 एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे शिक्षक चंद्रशेखर महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक लक्ष्मण मादरपल्ले , माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री, उपमुख्याध्यापक वंदना बंगाळे, पर्यवेक्षक रमेश गीराम आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अनंत काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितांजना सुगावकर, छाया घोळवे, सीमा साळवे, सुजाता मिसाळ, गोदावरी मुधोळकर, सारिका संगेवार, मेघा तम्मेवार ,चंद्रकांत अलापुरे, बाळू घुगे, शिवप्रसाद मठपती, सुरेश लव्हाळे, विजय बेद्रे, खळीकर, वाळके आदींनी परिश्रम घेतले.





