




✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.14एप्रिल):–महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक समरसता मंच चंद्रपूर तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक लक्ष्मणराव ओलालवार, विभाग कार्यवाह दत्ताजी बहाद्दूरे, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष वसंतराव थोटे,अश्विनजी जयपुरकर, दीनदयाल कावरे, विश्व हिन्दू परिषद तर्फे गणपत सत्रे, विद्याभारतीचे विवेक आंबेकर, सामाजिक समरसता मंचाचे डॉ.नंदकिशोर मैंदळकर, नंदू घाटे, विष्णू जुमडे, विनय आत्राम, शैलेश पर्वते, शत्रुघन कांबळी, कपिश उजगावकर, मयूर घोंगे, आदित्य देशपांडे, ओंकार अंदनकार, शुभम दयालवार, राजू कांबळे व अन्य स्वयंसेवक उपस्थित होते.




