




✒️नितिन रामटेके(विशेष प्रतिनिधी)
गोंडपीपरी(दि.14एप्रिल):-जि प उ प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा येथे शाळा पूर्व तयारी पहिला मेळावा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुर मलेल्लवार सरपंच, उद्घाटक सुनील मुत्यालवर केंद्रप्रमुख, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोनिका देवतडे, पोलीस पाटील शारदा पिंपळकर, उपसरपंच पायल देवतडे, मुख्याध्यापक छोटुभाई आवडे, विनोद मेश्राम, सोनी गौरकर, ज्योत्स्ना कोवे, छाया लडके, भोयर, विट्ठल गोंडे, प्रमोद दुर्गे, आक्केवार मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.सकाळी तिमाजी पोतराजे यांच्या बैलगाडीने दाखल पात्र विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून बँड पथक यांच्या साहाय्याने गावात प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच गीतांजली चौधरी यांच्या नेतृत्वात टन टन घंटी बजी, आनंदाने गाऊ या गीतावर वर्ग 7 वी च्या विद्यार्थ्यांनी कृतीयुक्त गीत सादर करून शाळा पूर्व तयारीची जनजागृती केली. गावातील सर्व पालकांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. उपस्थित सर्व पाहुण्यांनी शाळा पूर्व तयारी कार्यक्रमाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
उद्घाटन सोहळा संपल्यानंतर सात स्टॉल वर दाखल पात्र 20 विद्यार्थ्यांचे विकासपत्र भरून घेतले. पूर्ण ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या. ज्या विद्यार्थ्यांना कृती करता आले नाही त्यांना मोरे सर यांनी समुपदेशन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल गोंडे यांनी केले. संचालन गौतम उराडे यांनी केले तर सर्व पाहुण्यांचे आभार गणेश गेडाम यांनी मानले. सरते शेवटी सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित पाहुण्यांना गोड जेवण देण्यात आलं.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वामन कोकुलवार, गोंडे सर,उराडे सर,गेडाम सर, मोरे सर,गीतांजली चौधरी मॅडम, स्वयंसेवक संजीवनी फरकडे,राहुल शेंडे,प्रमोद दुर्गे यांनी सहकार्य केले.




