Home महाराष्ट्र तीन अपयशांवर मात करीत अनुकृती शर्माने ‘यशाचे शिखर’ गाठलेच!

तीन अपयशांवर मात करीत अनुकृती शर्माने ‘यशाचे शिखर’ गाठलेच!

291

✒️प्रा डॉ सुधीर अग्रवाल(९५६१५९४३०६)

अपयश हीच यशाची पहिली पायरी असून सलग तीनदा अपयशी ठरूनही खचून न जाता संसार सांभाळत सेल्फ स्टडी करत जिद्दीच्या बळावर चौथ्या प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुकृती शर्मानं यश मिळवीलं.

प्रत्येकाच्या कारकिर्दीत (करियर) अनेक चढउतार येतात. कधी यश तर कधी अपयश पाहायला मिळते. मात्र रात्रीनंतर दिवस त्याप्रमाणे अपयशानंतर यश ठरलेले आहे. त्याचा विशिष्ट कालावधी ठरलेला असतो. मात्र कमी किंवा अधिक तो आपल्यावर अवलंबून असतो. यशाने हुरळून जायचे नसते तर अपयशाने खचून जायचे नसते. यश डोक्यात जाता कामा नये. तसेच अपयशाने सर्वकाही संपले असे समजू नये.

अपयशावर मात करणारे शेकडो लोक आहेत. त्यांच्याकडून अनेकांना प्रेरणा मिळत आली आहे अनुकृती शर्मा हे असंच एक नाव. अपयशाने खचून न जाता संसाराचा गाडा हाकताना अनुकृती शर्मा या विवाहित तरुणींन आपला संसार सांभाळून युपीएसची परीक्षा उत्तीर्ण केली.

युपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणं अनेकांचं लक्ष्य असतं. ही खडतर परीक्षा उत्तीर्ण होऊन सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न अनेकजण पाहत असतात. अनेकजणांकडून ऐकायला मिळतं की, या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी क्लास लावायलाच हवा. परंतू अनुकृती शर्माने हे धारणा खोडून काढली आहे. तिने कोणताही क्लास न लावता फक्त इंटरनेटच्या मदतीने परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

लग्नानंतर बहुतांश तरुणींचा संसारातील जबाबदाऱ्या सांभाळण्यात वेळ जातो. असं असतानाही अनुकृती शर्मा या तरुणीने प्रतिकुल परिस्थितीतही आयएएस होण्याचा निश्चय केला. आणि तयारी सुरू केली. तिचं म्हणणं आहे की, तुम्ही अभ्यासात सातत्य ठेवल्यास, तुम्हाला यश नक्की मिळेल. अनुकृतीसारखी अधिकारी त्या मुलींसाठीही प्रेरणादायी ठरतेय ज्या लग्नानंतरही युपीएससी परीक्षा देण्याचा विचार करीत असतात.

अनुकृती शर्माने आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर तिने विज्ञानात विदेशात संशोधन केले.त्यानंतर भारतात येऊन युपीएससी नागरी सेवा परीक्षा दिली. युपीएससीमध्ये सलग 3 वेळा अपयश आलं. परंतू ती निराश झाली नाही. तिने आपला अभ्यास सुरू ठेवला. युपीएससी २०१७ च्या परीक्षेत तिला अखेर यश मिळाले. युपीएससी नागरी सेवेत तिला ३५५ वी रॅंक मिळाली. परंतू या रँकवर ती समाधानी नव्हती. २०१९ मध्ये आणखी एक प्रयत्न केला यावेळी तिला १३८ वी रँक मिळाली. आणि तिचे आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी अनुकृतीचा सल्ला

युपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अनुकृतीने सेल्फ स्टडीवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. ती म्हटली तुम्ही कोचिंग करीत असाल तर, चांगली गोष्ट आहे. परंतू सेल्फ स्टडीवर फोकस ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

अनेकदा तुम्हाला अपयश मिळू शकतं. परंतू निराश होण्याची गरज नाही. आज आपल्याकडे इंटरनेट सहज उपलब्ध आहे. इंटरनेटवर युपीएससी परीक्षेशी संबधित अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्यामाध्यमातून तुम्ही तयारी करू शकता. परंतू तुम्ही तुमचा अभ्यास अचूक निवडायला हवा. अन्यथा तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. अभ्यास करताना तुमची प्रगती वेळोवेळी तपासात राहा. जेणेकरून तुम्ही परीक्षा उत्तीर्ण करू शकाल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here