Home महाराष्ट्र जय काळबांडे आणि शिरीष काळबांडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रकलेतून दिल्या...

जय काळबांडे आणि शिरीष काळबांडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रकलेतून दिल्या शुभेच्छा..!

229

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.14एप्रिल):-तालुक्यातील कारखेड येथील इयत्ता पाचवीतील जय काळबांडे आणि इयत्ता दुसरीचा शिरीष काळबांडे यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती त्यांनी त्यांच्या कल्पनेने साकारली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे.

त्यांच्या कलेचे कौतुक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चे सर्व शिक्षकवृंद च्या वतीने कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयच्या मुख्याध्यापिका पेंधे मॅडम यांनी इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेला शिरीष गजानन काळबांडे यांचे खूप खूप मनापासून कौतुक केले आणि शिरीष याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

त्याच सोबत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चे मुख्याध्यापक श्री देशमुख सर यांनी इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेला जय गजानन काळबांडे यांचे पण मनापासून स्वागत केले आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यासोबतच जय आणि शिरीष ने सकाळ पेपर तर्फे घेण्यात आलेल्या” सायन्स अॅड मी 2022 “चित्रकला स्पर्धेमध्ये दोघांनीही भाग घेतला होता. त्यामध्ये त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सोबतच “स्वच्छ सर्वेक्षण 2022 नगर परिषद उमरखेड” यांच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये आणि टाकाऊ वस्तू पासून ओला कचरा सुका कचरा प्रतिकृती साकारल्याबद्दल दोघांनाही सन्मानपत्र व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

त्याचसोबत वन विभाग नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था उमरखेड यांच्या वतीने पक्षी खोली पोस्टर स्पर्धेमध्ये जय काळबांडे आणि शिरीष काळबांडे यांना प्रमाणपत्र देऊन करण्यात गौरविण्यात आले आहे.असे अनेक स्पर्धेमध्ये या दोघांनी भाग घेतले आहे.

कॉम्पिटिशन यामध्येच मागील वेळेस टाकाऊ वस्तु पासून जय काळबांडे यांनी दीक्षाभूमी ची प्रतिकृती हुबेहूब साकारली होती त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील इयत्ता पाचवी मध्ये शिकणाऱ्या जय गजानन काळबांडे या विद्यार्थ्यांनी दीक्षाभूमी प्रतिकृती साकारली त्यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा भावपूर्ण सत्कार करून जय मधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी पुढील पाच वर्ष त्याला कला क्षेत्रासाठी लागणाऱ्या सर्व मार्गदर्शनाचा खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

रामभाऊ देवसरकर अध्यक्ष यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज सभापती अर्थ व बांधकाम जि .प. यवतमाळ आणि सर्व शाळेच्या वतीने दोन्ही मुलांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here