Home महाराष्ट्र उमरखेड शहरामध्ये भव्यदिव्य मोटर सायकल अभिवादन रॅली संपन्न

उमरखेड शहरामध्ये भव्यदिव्य मोटर सायकल अभिवादन रॅली संपन्न

283

🔹मोटर सायकल रॅलीने शहर दुमदमले…!

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.14एप्रिल):-शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सर्व समाज बांधवांच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य मोटरसायकल अभिवादन रॅली काढण्यात आली होती.यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी उपस्थित राहून भव्य मोटर सायकल रॅली ही यशस्वीपणे पार पडली.सदर मोटार सायकल रॅलीला कुठलीही गालबोट लागला नाही किंवा अडचण निर्माण झाली नाही.अतिशय शांत मार्गाने शहरामध्ये फेरफटका मारून रोड सर्व महापुरुषांच्या तेल चित्रा ला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णआकृती पुतळ्याजवळ संपन्न झाली.शेवटी आयोजकांनी सर्व मोटर सायकल रॅलीतील समाज बांधवांचे खूप खूप आधार मानलेत.

भव्य मोटर सायकल अभिवादन रॅली चे आयोजन सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना तथा जिल्हा प्रतिनिधी), कुमार केंद्रेकर (अध्यक्ष शांतिदुत समिती), शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भिम टायगर सेना), डी.के दामोदर (जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी), संतोषभाऊ जोगदंडे (तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी), एडवोकेट पंजाबराव नवसागरे साहेब शाहरुख पठाण (प्रवक्ते पुरोगामी युवा ब्रिगेड) शुद्धोधन दिवेकर, वीरेंद्र खंदारे, सतिश कोल्हे, नितीन आठवले, सिद्धार्थ बरडे,बबलू भालेराव सुधाकरराव लोमटे सर, कैलास कदम,संदीप विनकरे, तपासे सिद्धार्थ कोल्हे, रोहित धुळे इत्यादी शेकडो तरुण मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here