




🔹वरिष्ठांच्या आदेशाला केज पंचायत समितीकडून केराची टोपली
✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई प्रतिनिधी)मो:-8080942185
केज(दि.12एप्रिल):-तालुक्यातील लव्हरी येथील भ्रष्टाचार व अनियमिततेबाबत चौकशी करून अहवाल अद्यापपर्यंत अहवाल सादर न केल्याने वरिष्ठांकडून केज पंचायत समितीच्या अधिकारी यांना ठोस नोटीस बजावण्यात आली आहे. तरी देखील संबंधित अधिकारी यांच्या कडून चौकशी साठी टाळाटाळ केली जात आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की लव्हरी ता. केज येथील भ्रष्टाचार व अनियमिततेबाबत चौकशी करून अहवाल सादर करणेबाबत गटविकास अधिकारी प.स. केज यांना आदेशीत केले होते. सदर प्रकरणात गटविकास अधिकारी यांनी चौकशी केली नाही. सदरचे प्रकरण चौकशी अभावी पंचायत समिती स्तरावर तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी पासून प्रलंबीत आहे. त्यामुळे दि. 21.03.2022 रोजी मा.मु.का.अ. जि.प.बीड यांचे दालनात सुनावणी घेण्यात आली सदरील सुनावणी दरम्यान आपणास तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत सूचित करुनही पंचायत समितीकडून चौकशी अहवाल अद्यापपावेतो या कार्यालयास प्राप्त झाला नाही. या प्रकरणी श्री. चाळक कैलास ,पंडीत चाळक, कृष्णा जगताप आणि इतर यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्र. 8949 / 2022 दाखल केलेली आहे.
आपला चौकशी अहवाल अप्राप्त असल्याने विषयांकित प्रकरणी पुढील कार्यवाही करता आली नाही. आपली ही कृती शासन नियमांच्या विपरीत असल्यामुळे शासकीय कामात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा केल्याबाबत आपणास जबाबदार धरून महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणुक ) नियम 1979 चे कलम 3 चा भंग केल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपिल ) 1979 नुसार आपणा विरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रस्तावित का करण्यात येवू नये असा खणखणीत इशारा वरिष्ठांकडून देण्यात आला आहे. व याचा खुलासा ही नोटीस मिळताच 02 दिवसाचे आत वरिष्ठ कार्यालयास चौकशी अहवालासह सादर करावा . आपला खुलासा व चौकशी अहवाल विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यास अथवा समाधानकारक नसल्यास आपणाविरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही शासन नियमानुसार प्रस्तावित केली जाईल तसेच वरील न्यायालयीन प्रकरणी काही गुंतागुंत निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही गटविकास अधिकारी यांची राहील, याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी. असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांनी दिला आहे.
चौकट:-
चौकशी समिती प्रमुख तथा गटविकास अधिकारी श्री नागरगोजे हे जाणीवपूर्वक चौकशी ची टाळाटाळ करून भ्रष्टाचार करणाऱ्यास पाठीशी घालत आहेत मा ceo साहेबांच्या आदेश असताना मागील 3 महिन्यापासून चौकशी करत नाहीत व 7 तारखेला दिलेल्या कारणे दाखवा नोटिस ला पण केराची टोपली दाखवली आहे आपले कर्मचारी काय करतात याचा मा ceo साहेबानी विचार करावा.
–
कैलास चाळक
संभाजी ब्रिगेड ता, केज जी,बीड




