



✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
खामगांव(दि.12एप्रिल):- दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही रविवार दि. १० एप्रिल रोजी एकनिष्ठा गौ-सेवा रक्तसेवा जनसेवा फाऊंडेशन तर्फे श्री रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरज यादव, रामनवमी उत्सव समिती अध्यक्ष गब्बु गुजरीवाल, ग्यानेश सेवक सर, आनंद चिंडाले, सिद्धेश्वर निर्मळ, विक्की सारवान, धिरज यादव, प्रदीप शमी, सोनू ठाकूर, यश शर्मा, सतीश देशमुख आदि लोकांच्या हस्ते सतीफैल सितला माता मंदिर मध्ये भगवान श्री राम व सीतला मातेची पुजी -प्रार्थना करून सायंकाळी ५ वाजता शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.
सीतला माता मंदिरापासून सुरू झालेली ही मिरवणूक सतीफैल, निर्मल टर्निंग, भुसावळ चौक, अर्जुन जल मंदिर, नटराज गार्डन, अग्रसेन चौक, गांधी बगीचा, टॉवर चौक, कोर्ट, सप्तशृंगी मंदिर, केला पोस्ट ऑफिसमार्गे सिव्हिल येथील राममंदिरावर आली. मंदीरात पूजा – आरती केल्यानंतर शोभायात्रेचा समारोप करण्यात आले. या मिरवणुकीत विविध जाती-धर्माचे अनेक लोक उत्साहाने आणि आनंदाने सहभागी झाले होते. संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडली. सुरज यादव यांनी मिरवणूक यशस्वीतेसाठी फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकार्यांनी व सदस्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले आणि सर्व नागरिकांनी समाजाच्या कल्याणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी सतत सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी पोलीस विभागाचे कृतज्ञता व्यक्त केले आणि त्यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनासाठी त्यांचे आभार मानले…


