Home महाराष्ट्र शोषित,पीडित, वंचित, श्रमिक, व दलितांच्या न्याय हक्कासाठी भारतीय संविधानाची निर्मिती

शोषित,पीडित, वंचित, श्रमिक, व दलितांच्या न्याय हक्कासाठी भारतीय संविधानाची निर्मिती

360

🔸प्रा.डॉ.अनिल काळबांडे सर यांचे प्रतिपादन

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.12एप्रिल):-डॉ बाबासाहेबांनी या देशातील समस्त शोषित ,पीडित, वंचित, श्रमिक, दलितांच्या न्याय हक्कासाठी भारतीय संविधानाची निर्मिती केली. हे संविधान सर्वांना न्याय हक्क आणि जीवन जगण्याची समान संधी देतो असे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ.अनिल काळबांडे यांनी प्रज्ञा पर्व धम्मक्रांती कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.पुसद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अर्थात धम्मक्रांती प्रज्ञा पर्व सायंकाळी आयोजित केलेल्या सत्रामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, उपासिका मायाताई ठोके, नायब तहसीलदार महागाव, या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून धम्मक्रांती प्रज्ञा पर्व चे अध्यक्ष, विठ्ठलराव खडसे सर इंदूताई राऊत, पंचशीला कांबळे गीता ताई कांबळे कांताताई थोरात अश्विनीताई पुनवटकर महानंदा ताई कांबळे पद्मा दिवेकर, अनिता कांबळे, छायाताई भगत, उषाताई ढोले , मीनाताई नाईक ललिता ताई खडसे , मनिषा ताई, वर्षाताई पाटील, इत्यादी मंचावर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे प्रज्वलन पूजन करण्यात आले.प्रा. डॉ. अनिल काळबांडे पुढे म्हणतात की या देशाला शस्त्राची नाहीतर शास्त्राची म्हणजेच भिमाच्या लेखनीची गरज आहे समाजातील सर्वच समस्येची उकल भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिली आहे .त्यामुळे संपूर्ण देशाचा उद्धार झाल्याचे ते म्हणाले…

पुढे बोलताना म्हणतात की टीका करण्यापेक्षा समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य केवळ आपल्याच वस्तीमध्ये न सांगता संपूर्ण जगाला सांगणे काळाची गरज आहे सर्व समाजाची माणसं कसे एकत्र येतील गुण्यागोविंदाने नांदतील हेही सांगणे तेवढीच काळाची गरज आहे असेही ते शेवटी म्हणाले.

*लहान बालकांनी भीम गीतावर नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली*

यानंतरच्या उत्तरार्धामध्ये संजय जीवने यांची कन्या सांची जीवने हिने माता रमाई या एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला उपस्थित सर्व महिला सहित समाज बांधवांना एक ते दीड तास स्तब्ध करून माता रमाई च्या सादरीकरणाने सर्वांच्या काळजाचा ठोका धड धड रडत होत्या, माता रमाई च्या प्रयोगाने व त्यांच्या सादरीकरणाने सर्वांची मन हेलावून गेले.

माता रमाईचा जीवन संघर्ष जसाच्या तसा उभा केल्याने सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते उत्कृष्ट रमाई एकपात्री अभिनयाला सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिशा दिलिप पाईकराव यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.उत्कर्षा नरेंद्र पाटील यांनी मानले.या धम्मक्रांती कार्यक्रमाला, यशस्वी करण्यासाठी, प्रज्ञापर्वचे अध्यक्ष विठ्ठल खडसे व समितीचे सर्व पदाधिकारी इत्यादीने परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here