




✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.12एप्रिल):-सामाजिक क्रांतीचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करून मा.नगरसेवक चंद्रकांत खंदारे यांनी आपला जन्मदिवस साजरा केला. अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक चंद्रकांत खंदारे यांची उपस्थिती होती तर अभिवादन कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन पारवे,राहुल साबणे,प्रशांत खंदारे, जुबेर चाऊस,सिद्धार्थ हत्ती हंबीरे,अनंत उजगरे यांची उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत खंदारे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना खंदारे म्हणाले ‘आधुनिक क्रांतीचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी सामाजिक कार्य करताना शिक्षणावर भर देत सामाजिक क्रांती घडवून आणली त्यामुळेच आज आम्ही सर्व भारतीय नागरिक सुखाचे जीवन जगत आहोत त्यामुळे मनापासून अभिवादन करणे महत्त्वाचे वाटते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक विलास लांडगे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ हत्तींबिरे यांनी व्यक्त केले.




