Home महाराष्ट्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा हरडफ मध्ये उडाला बोजवारा.. रस्त्याचे काम अर्धवटच; झालेले ही...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा हरडफ मध्ये उडाला बोजवारा.. रस्त्याचे काम अर्धवटच; झालेले ही काम निकृष्ट दर्जाचे

230

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगाव नांदेड,प्रतिनिधी)मो:-9373868284

हादगाव(दि.12एप्रिल):- तालुक्यातील हरडफ येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम चालू असून सदर काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने काम पूर्ण होण्याआधीच त्याचा बोजवारा उडाला असल्याचे गावातील विकास प्रेमी नागरिक आपली नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष वेधून हेच काम उत्कृष्ट दर्जाचे करावे अशी मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे. त्याच बरोबर सदर रस्त्याचा कामाची लांबी हरडफ फाट्यापासुन चार किलोमीटर असून सदरील रस्ता हा अंदाजपत्रकानुसार होताना दिसत नाही. सदर रस्त्यावर दोन पुलाचे बांधकाम करण्यात आले त्या पुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून एका महिन्याच्या आत त्या पुलांना भेगा पडल्या असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . मग या पुलाचे , वरस्त्याचे बिल काढतांना अभियंता साहेबांनी काय डोळे मिटून सह्या केल्या की काय असा संतप्त सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सिद्धार्थ वाठोरे यांनी उपस्थित केला आहे.

सदरील रस्ता हा दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता असल्यामुळे सहाजिकच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कामावर संबंधित अधिकार्‍याचे लक्ष नसल्याने सुरुवातीपासूनच हा रस्ता निकृष्ट दर्जाचा होत आहे. दोन ते तीन किलो मिटर रस्ता करण्यात आला परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने जागोजागी खड्डे पडले असून एक किलो मिटर रस्तावर गिट्टि अंथरूण त्यावर मुरुमा ऐवजी काळया मातिचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे . आणि या रस्त्यावर साखरकारखाना असल्याचे मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हदगाव तालुक्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम झालेले आहे पण बहुतांश ठिकाणी कामाचा बोजवारा उडाला उडाला असल्याचे दिसून येत आहे . यास सर्वस्वी जिल्ह्याचे आणी तालुक्याचे आधिकारी यांचे उदासीन धोरण कारणीभूत असल्याचे जाणकार सांगतात..हा रस्ता दर्जेदार चांगला प्रकारचा केव्हा होईल आणि नागरिकांची होणारी दैना केव्हा संपेल संपूर्ण रस्ता होण्यासाठी आणखी किती दिवस प्रतिक्षा करावी लागणार या रस्त्याच्या निधी उपलब्ध असून सुद्धा हा रस्ता एवढ्या संथ गतीने का होत आहे असाही प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे या रस्त्याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची हरडफ वाशीयाकडून मागणी होत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here