



🔸शेकडो वर्षा पासून चालत आलेली परंपरा रामनवमी यात्रा
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. ११ एप्रिल):-ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो) येथे शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली रामनवमी यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या गावाला संताची भुमी म्हणून ओळखले जाते. येथे अनेक संत होऊन गेले. आजही त्यांच्या समाधी जागृत आहेत, अशी भाविकांची श्रध्दा आहे. त्यामूळे त्याच्या समाधी दर्शनासाठी हजारो भाविक रामनवमी यात्रेला येत असतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा रामनवमी साजरी करण्यात आली. रामनवमीनिमित्त यात्रा भरली. शेकडो भाविक या यात्रेत आले. यात्रेत जातीमंद सोडून सर्व जातीधर्माचे लोक सहभागी होत असतात. या यात्रेनिमित्य गुडीपाडवा ते रामनवमी या दिवसात येथे कुणीही मासाहार करीत नाही स्वईच्छेने पुर्वीपासुनच हे नियम पाळले जाते.
येथे संत पांजीबाबा, आडकूबाबा, जेठूजी महाराज असे संत होऊन गेले. पिपंळगाव (भो) येथे गुडीपाडवा पासुन सुरू होणारा हा उत्सव १० एप्रिलपर्यंत साजरा करण्यात आला. यानिर्मीत्य येथील तिन्ही मंदीरात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आला. आडकूबाबा देवस्थानात ह.भ.प. हाडगे महाराज, हनुमान मंदीर पेठ वार्ड येथे ह.भ.प. उमाजी कुथे महाराज तर पांजीबाबा देवस्थान येथे ह.भ.प. निर्मला नाकतोडे महाराज यांच्या भागवत प्रवचण सप्ताहाचे आयोजन करण्यात आला व १० एप्रिलला तिन्ही देवस्थानांमध्ये श्रीराम जन्म सोहळा साजरा करण्यात आला.त्याचबरोबर श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीद्वारे १० एप्रिल रात्री ११ वाजता यात्रेच्या ठिकाणी प्रसिध्द माँ भगवती जागरण गायक व गितकार वेदप्रकाश शुक्ला यांचे जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तसेच यात्रेत सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.रामनवमीच्या दिवशी रात्री १२ वाजता दिंडी सोहळ्याच्या गजरात तिन्ही देवस्थान मधून श्री हनुमान पालखी काढण्यात आली. पालखीचे आयोजन खूप थाटामाटात साजरा करण्यात आला. पालखी सोहळा रात्री १२ वाजतापासून दुसऱ्या दिवशी सायंकाळ पर्यंत चालला. रामनवमीच्या या भव्य आयोजनात समस्त गावकऱ्यांचे खूप मोठा सहभाग होता. सदर माहिती सुरज वामन तुपट यांनी दिली.





