



✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
कोरपना(दि.11एप्रिल):-येथील तलावापासुन खैरगाव गावाला जोडणारा रस्ता आहे.मात्र हा रस्ता स्वतंत्र्याची अनेक दशके लोटनूही आजतागायत पक्क्या स्वरूपात झालेला नाही.त्यामुळे गावकरी व शेतकऱ्यांना अधिकेचे अंतर मोजून प्रवास करावा लागत आहे.कोरपना ते खैरगाव या दोन गावांतील वास्तविक अंतर हे तीन, चार किलोमीटर अंतराचे आहे.परंतु या रस्त्याचे खडीकरण व पक्क्या रस्त्यात रुपांतर न झाल्याने ग्रामस्थांना सहा ते सात किलोमीटरचे अधिक अंतर मोजावे लागत आहे.या भागातील शेतकऱ्यांनाही पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात चिखल तुडवीत शेतात जावे लागते.
हा मार्ग झाल्यास खैरगाव येथील ग्रामस्थांना कोरपना बाजारपेठेत कमी अंतरावर थेट जाता येईल, तसेच येल्लापूरपासुन सावलहिरा, खैरगाव गावाना हा सरळ मार्ग कोरपना गाठण्यासाठी कमी अंतराचा व सोयीचा होईल. याचा फायदा म्हनजे वेळ व प्रवासासाठी बसणाऱ्या आर्थिक भुदंडाच्या दुष्टीने कमी होईल.मागील अनेक वर्षांपासून पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना अनेक अडणीच्या सामना करावा लागत आहे,याबाबत त्यांच्या तक्रारीही आहेत या अनुषंगाने व बांधकाम विभागाने लक्ष घालून कोरपना येथील तलावापासुन खैरगाव गावापर्यंतच्या रस्याची त्वरीत निर्मिती करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून होत आहे.





