



🔹नागभीड़ येथील माहेश्वरी समाजाने सादर केले निवेदन
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
नागभीड(दि.11एप्रिल):-माहेश्वरी समाजातील दानशूर व्यक्तिमत्व व नांदेड शहरातील प्रतिष्ठित युवा व्यवसायी श्री संजय बालाप्रसादजी बियानी यांच्या हत्येच्या निषेधार्थ नागभीड़ येथील माहेश्वरी समाजाने निवेदन देऊन मारेकऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली.
नांदेड चे सुप्रसिद्ध बिल्डर व्यवसायी तथा सामाजिक कार्यकर्ते संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी भरदिवसा बंदूकीच्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली . बियाणी यांचे मारेकारी आजतागायत पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.समाजातील आर्थिकरित्या दुर्बल घटकांसाठी सतत धडपड करणाऱ्या तथा कोणत्याही सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणाऱ्या व्यक्तीचे असे अवेळी निघुन जाणे ही समाजाची कधीच पूर्ण न होऊ शकणारी क्षति आहे , ही पोकळी कधीच भरून निघणार नाही .
माहेश्वरी समाज नेहमीच राष्ट्र निर्माणाच्या कार्यात अग्रेसर असतो . समस्त भारतवर्षात मंदिर , धर्मशाळा , पाणपोई , धर्मार्थ दवाखाने , गौरक्षण , शाळा , कॉलेज साठी सेवा देणारा समाज म्हणून माहेश्वरी समाजाची ख्याती आहे . नेहमी कायद्याच्या चौकटित राहून काम करणाऱ्या समाजातील व्यक्तिवर झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे समाजात भीतिचे वातावरण तयार झाले आहे . स्व. संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना तसेच या कारस्थानात सामिल इतर आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही फास्ट ट्रैक कोर्ट च्या माध्यमातून करण्यात यावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांना नागभीड़ येथील समाजाने मान. तहसीलदार मनोहर चव्हाण यांचे मार्फ़त दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे .
नागभीड़ तहसील माहेश्वरी संघटनेचे अध्यक्ष ठाकुरदास काबरा , सचिव विनोद मेहता , कोषाध्यक्ष मनमोहन कलंत्री , प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजय रमेशचंद्रजी काबरा , विजय काबरा , सुरेश मुंदडा , ओमप्रकाश काबरा , दर्पण भट्टड यावेळी उपस्थित होते .


