Home महाराष्ट्र महापुरूषांच्या जयंत्या सर्व जाती-धर्मांनी एकत्र साजऱ्या कराव्यात – गोविंद यादव

महापुरूषांच्या जयंत्या सर्व जाती-धर्मांनी एकत्र साजऱ्या कराव्यात – गोविंद यादव

167

🔸शैक्षणीक साहित्याचे वाटप करून गंगाखेडला महात्मा फुले यांची जयंती साजरी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.11एप्रिल):-क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गंगाखेड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप करण्यात आले. हे साहित्य मिळाल्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद अवर्णनीय होता. महापुरूष कोणत्या जातीत जन्मले म्हणून ते केवळ विशिष्ट जातीचे राहू शकत नाहीत. महापुरूषांचे कार्य जाती-धर्माच्या पुढे असते. म्हणून अशा महापुरूषांच्या जयंत्या विविध जाती धर्मांनी एकत्र येवून साजऱ्या केल्या पाहिजेत, अशा भावना या प्रसंगी बोलताना कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी व्यक्त केल्या.

शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रसार हीच महात्मा फुले यांना खरी आदरांजली असेल, अशी अपेक्षा या प्रसंगी बोलताना गोविंद यादव यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास युवा नेते साहेबराव चौधरी, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बालासाहेब यादव, डॉ. निलेश गोरे, अभियंता योगेश आरसुडे, परसराम गिराम आदिंची प्रमुख ऊपस्थिती होती. सागर गोरे, वेदांत यादव, रणजीत शिंदे, रमेश शिंगणे आदिंच्या पुढाकारातून संत सावता माळी मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक आणि सुत्रसंचालन रणजीत शिंदे यांनी केले तर आभार दुर्गादास गिराम यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत यादव, अतुल सुरवसे, गंगाराम यादव, भागवत यादव, दत्ता यादव, रामभाऊ गिराम, विक्की क्षीरसागर, बाळासाहेब भोसले, डिगंबर यादव, अंबादास गिराम, नरहरी गिराम, सुरेश शिंदे, किशोर भोसले, अभिजीत चौधरी, अभिषेक यादव, स्वप्नील गिराम, संतोष पवार, प्रसाद यादव आदिंनी परिश्रम घेतले.

Previous articleगंगाखेडच्या ऐतिहासिक ३० एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महाउत्‍सवाची कार्यकारणी जाहीर
Next articleसुप्रसिद्ध बिल्डर व्यवसायी तथा सामाजिक कार्यकर्ते संजय बियाणी हत्येचा निषेध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here