




🔹स्वागताध्यक्षपदी डॉ सिद्धार्थ भालेराव, कार्याध्यक्षपदी प्रमोद साळवे तर अध्यक्षपदी गुणवंत कांबळे
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.10एप्रिल):-६५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या शहरातील डॉ.आंबेडकर नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव सोहळा दि.३० एप्रिल रोजी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षीच्या जयंती महासभा ची कार्यकारणी शुक्रवारी संध्याकाळी जाहीर झाली. यामध्ये स्वागताध्यक्षपदी डॉ.सिद्धार्थ भालेराव, कार्याध्यक्षपदी प्रमोद साळवे तर अध्यक्षपदी गुणवंत कांबळे यांच्यासह विस्तृत कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.
मागील ६५ वर्षात पासून रिपब्लिकन पक्षाचे नेते स्मृतीशेष पी.जी.भालेराव यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय संघटक सरचिटणीस स्मृतीशेष ॲड. गौतमदादा भालेराव यांच्या सहभागातून व मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या दि.३० एप्रिल रोजीच्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महाउत्सवासाठी राज्यभरासह परराज्यातून लाखो आंबेडकरी अनुयायी गंगाखेड शहरात दाखल होऊन उत्सवात सहभागी होत असतात. पारंपारिक पद्धतीने हा जयंती महाउत्सव राज्यभरात आगळावेगळा जयंती म्हणून परिचित आहे. दोन वर्षाच्या कोरोना कार्यकाळानंतर कोरोना मुक्त व निर्बंध मुक्त जयंतीच्या आयोजनासाठी शुक्रवारी शहरातील डॉ.आंबेडकर नगर येथील सम्राट निवासस्थानासमोर बैठक होऊन कार्यकार सर्वानुमते कार्यकारिणी निवडण्यात आली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीचे चेअरमन डॉ सिद्धार्थ भालेराव, माजी नायब तहसीलदार सोपानराव गायकवाड, प्रमोद साळवे चिंतामणी साळवे, नगरसेवक रन्धीरराजे भालेराव, मुंजाजीराव कांबळे, पांडुरंग साळवे यांच्या मुख्य उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते पुढील कार्यकारिणी निवडण्यात आली.
स्वागताध्यक्ष – डॉ. सिध्दार्थ भालेराव, कार्याध्यक्ष – प्रमोद साळवे, अध्यक्ष – गुणवंत कांबळे, सचिव – ॲड. भूषण अनंतराव साळवे, कोषाध्यक्ष – नगरसेवक रन्धीरराजे भालेराव, उपाध्यक्ष – चिंतामणी साळवे,मिरवणूक समिती प्रमुख – ॲड.विजय रंगनाथ साळवे, प्रशांत साळवे.या बैठकीस एन.के.साळवे, शशिकांत गवळी, संजय भालेराव, कैलास जगतकर, उत्तम साळवे, बालाजी जयवंता साळवे, शिलवंत कांबळे, मोतीराम कोरके, हनुमान साबळे, प्रशांत सावंत, प्रल्हाद साळवे, धनंजय साळवे, सचिन कांबळे, सिध्दार्थ कांबळे, नवनाथ साळवे, गंगाधर साळवे, आदित्य सिरसाठ, विश्वानंद साळवे, प्रविण साळवे, प्रतिक साळवे, संजय साळवे आदींसह शहरातील बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सांस्कृतिक कार्यक्रमांची होणार रेलचेल*
१३१ व्या सार्वजनिक जयंती उत्सव निमित्य प्रसिद्ध हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सामाजिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमही यानिमित्ताने राबविण्यात येणार आहेत.




