Home बीड राजकारण्यांपुढे झुकेगा नही साला…कायदा सर्वाना समान जालिंदर बनसोडे (वाहतुक पोलीस कर्मचारी)

राजकारण्यांपुढे झुकेगा नही साला…कायदा सर्वाना समान जालिंदर बनसोडे (वाहतुक पोलीस कर्मचारी)

214

🔸न्यायधीशाला दंड आकारून कायदा सर्वांना समान आहे दाखवून देणा-या व राजकारण्यांना न जुमानणा-या वाहतुक पोलीस कर्मचारी जालिंदर बनसोडेचा सत्कार-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.10एप्रिल):-न्यायाधीशांना सुद्धा कायदा समान आहे म्हणत दंड वसूल करणा-या वाहतुक विभागातील पोलीस कर्मचा-याच्या वरिष्ठांनी राजकारण्यापुढे गुडगे टेकत पोलिसांना हफ्तेखोर म्हणणा-या माजी नगरसेवकावर कारवाई करण्याऐवजी प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ बनसोडे यांची वाहतुक विभागातुन बीड शहर येथे लाॅक अप गार्ड ड्युटी दिली, म्हणून आज बनसोडे यांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठतेबद्दल सत्कार केला संविधान सर्वश्रेष्ठ मानुन कायद्याचं रक्षण करणा-या बनसोडेले सलाम.

न्यायधीशांना सिट बेल्ट नसल्यामुळे दंड आकारला
____
१ जुन २०२१ रोजीच्या दैनिक लोकमत बीड मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती, सीट बेल्ट न बांधल्यामुळे बीड प्रथम न्यायवर्ग दंडाधिकारी यांना वाहतुक विभागातील पोलीस कर्मचारी जालिंदर बनसोडे यांनी २०० रूपये दंड वसूल केला. या बद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक सुद्धा झाले होते.

नगरसेवकाने आमदाराच्या पीए सोबत वरिष्ठांची भेट घेऊन गुन्हा दाखल होऊ दिला नाही
____
दि.०५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वा माजी नगरसेवक सुभाष सपकाळ यांचा मुलगा आदर्श विद्यालयासमोर चारचाकी वाहन एमएच-२३ बीसी ०८०० चालवत असताना सीटबेल्ट नसल्यामुळे त्याठीकाणचे वाहतुक विभागातील पोलीस कर्मचारी जालिंदर बनसोडे पो.ना. बक्कल क्रमांक १६८४ यांनी २०० रूपये दंड ई चलन मशिनद्वारे आकारला त्यावेळी वाहनचालकाने मागील थकीत २०० रू दंड असा एकुण ४०० रूपये दंड भरून निघाले असताना त्याठीकाणी मुलाचे वडील माजी नगरसेवक सुभाष सपकाळ हे आले आणि बनसोडे यांच्यावर धाऊनजात अरेरावी करत तुम्ही हफ्ते घेता, वाळुच्या गाड्या सोडुन देता आदि मोठमोठ्याने बोलत होते, संबधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितल्यानंतर बीडचे आमदार यांचे पीए गणेश भरनाळे यांनी फोनवरून बनसोडे यांना सुभाष सपकाळ ओळखीचे आहेत त्यांच्यावर कारवाई करू नका म्हणून सांगितले परंतु बनसोडे यांनी कारवाई करणार असे सांगितले. त्यानंतर पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सुभाष सपकाळ व त्यांचे कार्यकर्ते भेटले त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर निघून गेले .बनसोडे यांनी व्हीडिओ चित्रण सह कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर वरिष्ठांनी जा तुझे काम कर, काही कारवाई करायची नाही म्हणत दुर्लक्ष केले.
त्यानंतर नगरसेवकावर कारवाई करण्याऐवजी भनसोडे यांचीच ड्युटी वाहतुक विभागातुन शहर लाॅकअप गार्ड म्हणून नेमनुक केली. एकुणच वरिष्ठांनी आपल्या कर्मचा-यांना न्याय देण्याऐवजी राजकीय नेत्यापुढे झुकत पोलीस कर्मचा-यांची ईतरत्र नेमणुक केली.

आ.विनायकराव मेटे यांचे दुखणे फक्त बनसोडे माझ्या माणसाची गाडी सोड अन्यथा तुला त्रास होईल
____
आ.विनायकराव मेटे यांनी बनसोडे जालिंदर यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून थेट विधानपरिषदेत मागणी केली, त्यामागे खरे दुखणे वेगळेच आहे

क्रमांक १
ज्या अक्षय सुरेंद्र शिंदे यांच्या तक्रारीवरून आ.मेटे यांनी तक्रार केली त्यांचा २५ मार्च २०२२ रोजी वाहन क्रमांक एमएच २३ एव्ही ३६०० यांना ५०० रू दंड केला आहे तो ईचलन द्वारे केला आहे त्याठिकाणी आ.मेटे यांचे बनसोडेंनी ऐकले नाही.

क्रमांक २
____
दि.०४ डिसेंबर २०२१ रोजी संदिप सखाराम धुमाळ, पिंपळवाडी सरपंच यांना वाहन क्रमांक एमएच १४ ईके ८९७५ दुचाकी गाडी संदर्भात २०० रूपये दंड आकारण्यात आला होता
तेव्हा सुद्धा आ.मेटे यांच्या पीएच्या फोनवरून गाडी सोडण्याचे सांगून सुद्धा गाडी सोडली नव्हती म्हणून आ.मेटे यांचा बनसोडे जालिंदर यांच्यावर राग म्हणून तक्रार.

क्रमांक ३
_____
दि. ०३ नोव्हेंबर २०२१ रोजी सरकारी दवाखान्यासमोर चालक मालक अमजदखान यांची बुलेट क्रमांक एमएच ०३ बीएल ७८५० यांनी पाठीमागील बाजूस नंबर प्लेट ०३ बीएल ७८६ असा चुकीचा नंबर लिहिला होता म्हणून त्यांना दंड आकारण्यात आला होता तेव्हा आ.मेटे यांनी फोनवरून” बनसोडे यांना माझ्या माणसाची गाडी सोड अन्यथा तुला त्रास होईल “अशी ठाणे दैनंदिनी तपशीलात नोंद सुद्धा आहे.म्हणून आ.मेटे यांचा बनसोडे जालिंदर यांच्यावर राग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here