Home महाराष्ट्र सिरसाळ्यात दिपस्थंभ सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन संपन्न

सिरसाळ्यात दिपस्थंभ सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन संपन्न

253

🔹सम्राट अशोक जयंती साजरी

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

सिरसाळा(दि.9एप्रिल):-वाचणाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती रुजावी, वाढावी या उद्देशाने पंचशीला बाई प्रमोद किरवले यांनी सिरसाळ्यात दिपस्थंभ सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली असुन सम्राट अशोक यांच्या जंयती निमित्ताने वाचनालयाचे उदघाटन करत लोकार्पण केले आहे.

उदघाटन कार्यक्रमास कल्पना राम आघाव, मधुकर किरवले,कपिल चोपडे, प्रा.विक्रम धन्वे, प्रा.दयानंद झिंजूर्डे, पत्रकार मिलिंद चोपडे, संभाजी आरसुळे, धम्मनंद किरवले, महादेव किरवले, कपिल किरवले,प्रविण सिरसाट तसेच यशोधरा महिला मंडळाच्या मंगलबाई किरवले, राधाबाई चोपडे, सौ.बन्सोडे,रोडे, सिरसाट,आरसुळे आदी सह अनेक जण उपस्थित होते.

पंचशिला किरवले यांनी म्हटंले कि,सिरसाळ्या सारख्या ग्रामीण भागात वाचनालय गरजेचे आहे, वाचनातून प्रगल्भ समाज निर्मित होतो, वाचनालयाचा लाभ वाचप्रेंमीनी घ्यावा असेही त्यांनी म्हटले आहे. प्रा.धन्वे यांनी सम्राट अशोक यांचे कार्य आपल्या भाषणातून सांगत वाचनालयाचे महत्व विशद केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.झिंजुर्डे यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here