Home महाराष्ट्र नायगावची बाल कलावन्त कु. सोनाली भेदेकरची लावणी होट्टल म्होस्तवात सादर होणार

नायगावची बाल कलावन्त कु. सोनाली भेदेकरची लावणी होट्टल म्होस्तवात सादर होणार

237

✒️नायगाव प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650

नायगाव(दि.9एप्रिल):- येथील रहिवासी असलेल्या कु. सोनाली बाळासाहेब भेदेकर या बालं कलावन्त विद्यार्थिनीला लावणी नृत्याचे सादरीकरण दि. ११ एप्रिल रोजी होट्टल महोत्सवात संधी मिळाली असून तिच्या या यशाबद्दल नायगाव शहरातील कलाप्रेमी कडून तिचे कौतुक होत आहे.अगदी बालवयात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेल्या लावणी कलेत सहभागी असलेल्या या चिमुकलीच्या लावणी कलेमुळे नायगाव शहर व परिसर दुमदुमून गेला आहे.अनेक कला म्होसत्व सांस्कृतिक शालेय व बाहेरच्या कार्यक्रमात सोनालीने आपली अदाकारी मोठं मोठ्या कलावंताला लाजवेल अशी लावणी च्या माध्यमातून कला तिने सादर केली आहे.

काल ९ एप्रिल रोजी होट्टल कला मोहोस्तवाला सुरुवात झाली असून आज दि.११ एप्रिल रोजी होट्टल परिसरात महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात लावणीची मेजवानी मिळणार आहे. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी या जनता हायस्कुल नायगाव व मयुरी संगीत विद्यालय नायगाव व स्वर संगम ग्रुप नायगावची विद्यार्थिनी सोनाली ला या कार्यक्रमात लावणी सादर करण्याची संधी दिली आहे.कु.सोनाली बाळासाहेब भेदेकर ही मूळची सहयोगनगर, नांयगाव बा. येथील रहिवासी असून काका माधव भेदेकर उत्कृष्ट कलावन्त व, आई- वडिलांना कलेची आवड असल्याने या चिमुकलीस अगदी बालवयातच कला क्षेत्रात त्यांनीपाठवले. दरम्यान कु. भेदेकर हीने गेल्या काही वर्षांत आपल्या कलेच्या माध्यमातून समाजमनावर आपले नाव कोरले आहे.

आतापर्यंत लावणीच्या माध्यमातून तिने जवळपास शेकडो कार्यक्रम केले असून, अनेक नामांकित संस्थेसह कलामहोस्तव च्या माध्यमातून आपल्या लावणी नृत्याच्या जोरावर विविध पुरस्कार मिळविले आहेत. दरम्यान दि. ९ एप्रिल पासून सुरू होत असलेल्या होट्टल महोत्सवात जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्यासह आयोजकांनी कु. सोनाली भेदेकर या १२ वर्षीय मुलीस दि. ११ एप्रिल रोजी होणाऱ्या महाराष्ट्राची लोकधारा या लावणी महोत्सवा मध्ये संधी दिली आहे.या निवडी बद्दल माजी आ वसंत चव्हाण,सभापती संजय बेळगे,उपनगराध्यक्ष विजय चव्हाण,श्रीनिवास चव्हाण एजुकेशन सोसायटी नायगाव चे सचिव प्रा रवींद्र वसंत चव्हाण, प्राचार्य के.जी.सूर्यवंशी,स्वर संगम चे अध्यक्ष बाळासाहेब पांडे,उपाध्यक्ष शंकर बिरादार,सचिव प्रा.माधव किन्हाळकर,कोषाध्यक्ष नामदेव पांचाळ,ज्ञानेश्वर बैस,त्र्यंबक स्वामी,मनोज सा.आरगुलवार,पवन गादेवार, विषु जोशी, बालाजी चौधरी,हरिप्रसाद पांडे,पत्रकार संदीप कांबळे व सर्व भेदेकर व बच्छाव परिवार यांनी सोनालीच्या निवडीचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here